महाविकासआघाडीचे पदवीधरचे उमेदवार जाहीर; औरंगाबाद, पुणे दोन्ही जागा राष्ट्रवादीला

राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला आहे. १ डिसेंबरला त्यासाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी औरंगाबाद विभागातून महाविकास आघाडीने उमेदवार दिले पण कॉंग्रेस या उमेदवाराला पाठिंबा देईल का?

“विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे श्री. सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे श्री. अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे. असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

पण औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीतील परिस्थिती चांगली नाही. कारण औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून काँग्रेस तळ्यात-मळ्यात आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले.

पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही काँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी काँग्रेस नेते पाठिंबा देतील का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर आहे. या जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. निकाल ३ डिसेंबर रोजी घोषित केला जाणार आहे.

अर्णबच्या सुटकेवर वेड्यासारखी नाचली कंगना; पहा व्हिडीओ

..आणि तुम्ही मला काहीही करू शकणार नाही, जेलमधून सुटताच अर्णबने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले

बँक खात्याशी संबंधित हे काम केले नाही तर…; निर्मला सीतारामन यांनी दिली ३१ मार्चची डेडलाईन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.