दुर्दैवी! कोरोनाच्या भितीने अस्थी विसर्जनालाही येत नाही नातेवाईक; पालिका कर्मचारीच करताय अस्थी विसर्जन

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. रुग्णांच्या मृत्युचे प्रमाणही वाढत चालले आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण जास्त आहेय

असे असतानाच काही धक्कादायक घटना घडत आहे. कोरोनाच्या संकटात रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी येत नाहीये, त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे. आता तर अस्थीमुळे कोरोना होईल म्हणून अस्थी विसर्जनासाठीही नातेवाईक येत नाहीये, त्यामुळे पालिकेतील कर्मचारीच अस्थी विसर्जन करत आहे.

आधी नातेवाईक अंत्यसंस्काराला यायचे नाही, पण आता काही प्रमाणात नातेवाईक अंत्यसंस्काराला येत आहे. असे असताना नातेवाईक अंत्यसंस्काराला येत असले तरी कोरोना होईल, या भितीने नातेवाईक अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीच्या अस्थीलाही हात लावत नाही, असे कैलास स्मशानभुमीत काम करणारे ललित जाधव यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

आम्ही कोरोना विषाणूच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सर्वजण काम करीत आहोत. आज एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. या काळात आमच्या इथे तीन हजारांपेक्षा जास्त नागरीकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

हा काळ खुप आमच्याकरीताही खुप कठिण आहे. आधी आम्ही पाच जण असायचो, कोणत्या वक्तीचा मृत्यु झालाय, ती कोण होती, आम्हाला काहीच माहित नसायचे. रुग्णालयामार्फत एक कागद यायचा. त्यावरील नोंद आमच्या डायरीत करुन ठेवायचो आणि अंत्यसंस्कार करायचो, असे जाधव यांनी म्हटले आहे.

तसेत अस्थी विसर्जन करण्यासाठी नातेवाईक घाबरत आहे, त्यामुळेही आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त अस्थी विसर्जन आम्हीच केले आहे. आम्ही त्यांची महिनाभर वाट पाहतो आणि मग आम्हीच संगम घाटावर जाऊन त्यांचे अस्थी विसर्जन करतो, असे जाधव यांनी म्हटले आहे.

मी आता पर्यंत जे ऐकले आहे, एकदा बॉडीचे विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले, की सर्व जंतू मरतात कारण आतमध्ये ७०० पेक्षा जास्त अंश सेल्सियस तापमान असते. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरून जायचे कारण नाही, असेही आवाहन जाधव यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदींमुळेच कोरोनाचा भडका, हिंदू नाराज होऊ नये म्हणुन कुंभमेळा होऊ दिला, बंगालमध्ये रॅली काढल्या
तज्ञ म्हणतात, तुम्ही घरात असून पण तुम्हाला होऊ शकतो कोरोना; बचावासाठी घ्या ही काळजी
सुजय विखेंची धाडसी मोहीम; नगरसाठी १० हजार रेमडिसीवीर स्वत: खाजगी विमानाने आणल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.