Share

पुण्याच्या २२ वर्षीय आर्या तावरेचा डंका; फोर्ब्जच्या यादीत झळकले नाव; वाचा काय कामगिरी केलीय…

महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे हीने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ च्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने अवघ्या २२ व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून आर्या तावरे(Aarya Taware) हीने लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या ‘फोर्ब्स’ या मासिकाने दखल घेतली आहे.(pune aarya tawre selected in forbes list)

सध्या सर्व स्तरातून आर्याचे कौतुक होतं आहे. ‘फोर्ब्स’ या जागतिक स्तरावर प्रतिष्ठित असणाऱ्या मासिकाने युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील ३० वर्षांखालील ३० प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत मराठमोळ्या आर्या तावरेला स्थान मिळाले आहे. आर्या तावरे मूळची बारामतीची असून तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पुण्यात घेतले आहे.

त्यानंतर आर्याने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये प्रवेश घेतला आणि ‘अर्बन प्लम्बिंग अँड रिअल इस्टेट फायनान्स’ या विषयातील पदवी घेतली. यानंतर आर्या तावरे हीने एक स्टार्टअप सुरु केले. बांधकाम व्यावसायिकांना मदत करण्यासाठी या स्टार्टअप सुरुवात केल्याचे आर्याने सांगितले. या कंपनीचे नाव ‘फ्यूचरब्रिक्स’ असे आहे.

या कंपनीचं सध्याचे बाजार मूल्य ३२.७ कोटी पौंड इतके आहे. आर्या तावरे हीचे वडील कल्याण तावरे हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. आर्याच्या कामगिरीवर तिचे वडील कल्याण तावरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आर्याने बांधकाम व्यावसायिकांकडे काम केले. त्यावेळी तेथील समस्या तिच्या लक्षात आल्या. ”

“त्या ठिकाणी लघु आणि मध्यम व्यावसायिकांना भांडवलाची कमतरता भासत होती. त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्याने ‘क्राउड फंडिंग’ ची संकल्पना मांडली. विद्यापीठाने यासाठी तिला मदत केली. विद्यापीठाने आर्याला स्वतंत्र यंत्रणा आणि कार्यालय उपलब्ध करून दिले”, असे कल्याण तावरे यांनी सांगितले आहे.

कल्याण तावरे यांनी पुढे सांगितले की, “आर्याचा स्टार्टअप सध्या वेगाने प्रगती करत आहे. अनेक वित्तपुरवठा करणाऱ्या मोठया कंपन्यांनी आर्याचा स्टार्टअपसोबत भागीदारी केली आहे. ‘फोर्ब्स’ मासिकाने तिच्या या कामगिरीची दखल घेतली आहे. या यादीतील ती एकमेव आशियाई वंशाची तरुणी आहे.”

महत्वाच्या बातम्या :-
‘मॅडम ब्लाऊज घालायच्या विसरल्या वाटतं…’; ‘त्या’ बोल्ड फोटोवरून प्राजक्ता माळी तुफान ट्रोल
ज्या मुलासाठी आर. माधवनने देश सोडला, तोच आता म्हणतोय, मला त्यांचा मुलगा म्हणून रहायचं नव्हतं..
कंगनाने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; पहा व्हायरल व्हिडिओ

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय राज्य

Join WhatsApp

Join Now