गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहे. अनेकदा अपघातात मृत्यू सुद्धा होतात. अशीच एक घटना आता पुण्यातून समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगरजवळ एक भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्री हा अपघात झाला आहे.
भरधाव वेगात जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या १७ महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये २ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ महिला या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहे.
अपघातास्थळी असलेल्या लोकांनी जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अपघातानंतर वाहनचालक तिथून पळून गेला आहे. आता पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघाग्रस्त महिला तेथील एका मंगलकार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. काम झाल्यानंतर त्या मध्यरात्री पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपूडी येथे उतरल्या होत्या. अशात एक वाहन अचानक आले त्यांनी त्यांना जोरदार घडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की २ महिलांचा तिथे जागीच मृत्यू झाला आहे. तर काही गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये १५ महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अपघात झाल्यानंतर महिलांनी आरडाओरड केला होता. अपघातग्रस्त असलेल्या सर्व महिला या गरीब कुटुंबातील होत्या. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिंदे सरकार टिकणार की गडगडणार? सर्वोच्च न्यायालयाचं अखेर ठरलं, मोठी अपडेट आली बाहेर
ब्रेकिंग न्युज! शिंदे सरकार टिकणार की कोसळणार? अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिली मोठी अपडेट
मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का? श्रीकांत शिंदेंची उचलबांगडी होणार? भाजपच्या हालचालींनी फुटला घाम