भाजप आमदाराची जीभ घसरली, म्हणाले ‘अदर पुनावाला डाकू, त्यांची कंपनी ताब्यात घ्या’

नवी दिल्ली l राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयानक रूप धारण केले आहे. देशात कोरोना लस उपलब्ध करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी खारीचा वाटा उचलला आहे.

देशात कोरोनावरील कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहे. देशात कोरोनावरील लस तयार झाल्याने देशभरातून या कंपन्यांचे कौतूक केले जात आहे. अशातच भाजप आमदाराने सीरमचे अदर पुनावाला यांच्यावर वादग्रस्त भाषेत टीका केली आहे.

गोरखपुरचे भाजप आमदार डॉ. राधामोहनदास अग्रवाल यांनी  म्हटले की, “अदर पुनावाला हे डाकू आहेत. मोदी, बी. एल. संतोष, अमित शाह, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत ताब्यात घेतली पाहिजे.” असं आमदार अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान सीरमने काल कोविशील्ड लसीचा दर निश्चित केला आहे. राज्य सरकारला ४०० रुपयांमध्ये, तर खाजगी हॉस्पीटल्सना ६०० रुपयांना लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच सीरमने केंद्र सरकारला १५० रुपयांत लस देणार असल्याचं सांगितलं आहे.

सीरमने केंद्र आणि राज्य सरकारला लसींचे वेगवेगळे दर निश्चित केल्याने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. सर्वसामान्यांना लसीसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. असं पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ इथवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात २,१०४ कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या देशात अॅक्टिव्ह रूग्ण संख्या २२ लाख ९१ हजार ४२८ आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळं आमच्या आयुष्याची वाट लागलीय आणि इथं लोकं आयपीएल खेळतायत; अभिनेत्री भडकली
मानलं भावा! रेल्वेकडून मिळालेल्या ५० हजारांमधील अर्धी रक्कम मयुर देणार त्या अंध मातेला
आता कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांच्या मृत्यु दाखल्यावरही मोदींचा फोटो?; वाचा काय आहे सत्य
रतन टाटा म्हणजे देवमाणूस! कोरोना काळातील मदतीसाठी नेटकऱ्यांकडून टाटांना साष्टांग नमस्कार

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.