भारतीय वंशाच्या पत्रकाराने ‘असा’ केला चीनचा पर्दाफाश; पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव

उत्कृष्ठ पत्रकारीता आणि साहीत्यकृतीसाठी दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. भारतीय वंशाच्या मेघा राजगोपालन यांना ही पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे.

मेघा राजगोपालन यांनी चीनचे सत्य जगासमोर आणले होते. त्यामुळे मेघा यांना हा पुरस्कार मिळाला आहे. चीनने रिएज्युकेशन कॅम्पमध्ये उइगुर मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांक गटांना कैद ठेवले होते. याबाबत मेघा यांनी हे सर्व उघडकीस आणले होते.

आंतरराष्ट्रीय पत्रकारीता प्रकारात मिळालेला हा पुरस्कार मेघा यांनी इंटरनेट मीडिया बझफिड न्युजच्या दोन सहकाऱ्यांसोबत वाटून घेतला आहे.चीनच्या शिबिरात मेघा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २४ लोकांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमधील माहिती तपासण्यासाठी त्यांनी उपग्रहातुन काढलेले फोटो आणि सिम्युलेशनचा वापर केला होता.

हे सर्व पाहून मला पुर्ण धक्का बसला होता, असे काही असू शकते याची मला कल्पनाही नव्हती, असे मेघा राजगोपालन यांनी म्हटले आहे. प्रकाशातुन मिळालेल्या माहितीनुसार, मेघा आणि त्यांच्या सहकारी एलिसन किलिंग आणि क्रिस्टो बुशेक यांनी मिळून २६० शिबिरांचा अभ्यास केला होता.

चीनने आतापर्यंत अनेकवेळा शिजियांगमध्ये राहत असलेल्या उइगुर मुस्लिमांवर दहशवाद पसरवल्याचा आरोप करत बंदी आणली आहे. तसेच त्या मुस्लिमांना प्रांतातील अधिकाऱ्यांनी चेतावणी दिली होती, की कुराण आणि नमाज पठण करणाऱ्या सर्व गोष्टी सोपवल्या नाही, तर शिक्षा देण्यात येईल.

त्यामुळे मेगा राजगोपालन यांनी एक डाटाबेस तयार केला होता. त्यांना चीनमधल्या लोकांची मुलाखत घ्यायची होती, पण त्यांना परवानगी भेटत नव्हती. त्यानंतर त्यांनी शेजारच्या देशात छावण्यांमधून पळून गेलेल्या लोकांकडून ही माहिती गोळा केली होती.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! चोराच्या घरावरच डल्ला, ८ कोटीचे समान चोरी होऊनही तक्रार नाही
महत्वाची माहिती! कोरोनाच्या आणि पावसाळ्याच्या काळात अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी
पाणी प्यायला गेलेल्या हत्तीमध्ये आणि मगरीमध्ये जुंपली, पहा थरारक भांडणाचा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.