…अन्यथा आम्हालाही आत्महत्या करावी लागेल, पुजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन

पुणे | पुजा चव्हाण आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्येला शिवसेना मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. राज्यभर याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. यामुळे कुटुंबाला मोठ्या बदनामीला सामोरे जावे लागत आहेत. यावर पुजाची बहिण दिव्या चव्हाण हिने संताप व्यक्त केला आहे.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आल्यापासूनच याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. मीडियात पुजा आणि संजय राठोड यांचे प्रेमसंबंध होते असे सांगण्यात येत आहे. तसेच पुजाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत. या फोटोमध्ये ती शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्या सोबत दिसत आहेत. मंत्री राठोड यांनी पुजाला अनेक भेटवस्तू दिले असल्याचेही बोलले जात आहे.

यासंदर्भात पुजा चव्हाणची बहिण दिया चव्हाण हिने सोशल मीडिया पोस्ट करुन भावनिक आवाहन केले आहे. तिने पुजाची होत असलेल्या बदनामीवर संताप व्यक्त केला आहे. पुजा चव्हाणचे नाव संजय राठोड यांच्यासोबत का जोडले जात आहे असा सवाल तिने विचारला आहे. पुजाची बदनामी करणारे आमच्या कुटुंबातून आणखी कोणी जायची वाट पाहत आहेत का? तसे असेल तर ते ही आम्ही करू असे दिया चव्हाणने म्हटले आहे.

दिया चव्हाणची इंन्स्टाग्राम पोस्ट
वृत्तमाध्यम सत्य लोकांसमोर यावे यासाठीच असतात ना? पंकजा मुंडे, प्रितम मुंडे त्यांच्यासोबतच्याही पुजाच्या पोस्ट आहेत. त्या का कोणी व्हायरल करत? जर त्या पुरूष असत्या तर तर त्यांच्यासोबतही पुजाचे नाव जोडले असते. माध्यमे ही काहीही मनघडन, त्यांच्या आवडीनूसार, काहीपण कॅप्शन देऊन वाटेल ती पुजाच्या नावाने खोटी माहिती प्रसारित करण्यासाठी आहेत.

प्रसार माध्यमातून सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत. म्हणे पुजाला कोणाकडून गिफ्ट मिळाले आहेत. आणि ते कथित व्यक्तिकडूनच भेटले असा दावाही वृत्तवाहिन्या करत आहेत. हे असे दररोज काहीतरी नवीन ऐकूण माध्यांवरुन विश्वास उडाला आहे.

कोणाचे दु:ख कमी करू शकत नसाल तर कृपया हात जोडून विनंती आहे की, त्यात भर तरी टाकू नका, हा त्रास आता दिवसेंदिवस असहनीय होत आहे. पुजा सुद्धा कोणाची तरी लेक आहे, कोणाची तरी बहिण आहे. अशा प्रकारची बदनामी करत आहात तुम्ही आम्ही सहन कशी करणार?

माझ्या आईवडिलांना काही व्हावे अशी तुमची इच्छा आहे का? अनेकदा सर्वांना विनंती करुनही आमची बदनामी करणे थांबत नाही. या बदनामीला कंटाळून कोणी आमच्या कुटुंबातून जायची वाट पाहात असाल तर सांगा, आम्ही ते ही करूत.. अशी पोस्ट दिया चव्हाण हिने लिहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
“मंत्री संजय राठोडनेच पुजा चव्हाणची हत्या केली”
पुजा चव्हाणसोबतच्या ‘त्या’ फोटोबद्दल संजय राठोडांनी दिले धक्कादायक स्पष्टीकरण
पुजाला यवतमाळला मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं; नातेवाईकांचा गंभीर आरोप
पुजा चव्हाणच्या मृत्यूचं घाणेरडं राजकारण केलं जातय – संजय राठोड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.