पुण्यात आत्मह.त्या केलेल्या तरुणीचे राज्यातील ‘या’ मंत्र्यासोबत कनेक्शन

पुणे | पुण्यातील वानवडी येथे पुजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्मह.त्या केली. २३ वर्षीय असलेल्या या तरुणीने रविवारी (ता.७) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्मह.त्या केली आहे. ही तरुणी मुळची बीड जिल्ह्यातील परळीची आहे. तिच्या आत्मह.त्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

पुजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपुर्वी पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लाससाठी आली होती. तिच्या आत्मह.त्येनंतर तिचे आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारच्या एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे विरोधी पक्षाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पुजा चव्हाण हिचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे तिने आत्मह.त्या केल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे भाजप ठाकरे सरकारवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता याप्रकरणी संबंधित मंत्र्याच्या नावाची कुजबुज सुरू झाली आहे.

आतापर्यत कोणत्याही नावाचा उल्लेख झाला नाही. मात्र भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी थेट ‘राठोडगिरी’ म्हणत सरकारवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे नाव उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या अडचणी वाढल्या! उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार ईडीच्या रडारवर
चहलच्या बायकोसोबत श्रेयस अय्यरने केलेला ‘हा’ डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील; पहा व्हिडीओ…
नऊ तास नोकरी करून ‘या’ महिलेनी केली यूपीएससीची परीक्षा पास
‘फॅन्ड्री’ चित्रपटातील शालूचा जिलेबी बाई गाण्यावरील डान्स पाहून चाहते झाले घायाळ; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.