पुजा चव्हाण लॅपटॉपबाबत भाजप नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले लॅपटॉप माझ्याकडे…

पुणे | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या प्रकरणी फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

अशात पुण्यातील भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. या नोटीशीमध्ये ‘पुजा चव्हाण यांचा लॅपटॉप आणून द्यावा’ अशी मागणी पोलिसांनी केली. आता याबाबत भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांनी वानवडी पोलिसांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यामांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना धनराज घोगरे म्हणाले, पुजा चव्हाण प्रकरणी माणुसकीच्या दृष्टीने घटनेच्या दिवशी मी मदत केली. त्याच दिवशी घटनास्थळी असलेला मोबाईल पोलिसांकडे देखील दिला. परंतु आता माझ्यावर पोलीस संशय घेऊन माझ्याकडे त्या तरुणीचा लॅपटॉप असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. मला त्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. हा मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्थानिक भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी शिवसेनेच्या बीड जिल्ह्याच्या महिला प्रमुख संगीता चव्हाण यांनी नगरसेवक घोगरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले की धनराज घोगरे यांनी पुजाच्या घरात घुसून तिचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरला आहे आणि त्यांनीच फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या आहेत.

पुण्यातील वानवडी येथे पुजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. आत्महत्येमागे शिवसेना मंत्री संजय राठोड असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर अखेर राठोड यांनी राजीनामा द्यावा लागला. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अशात पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर भाजपकडून पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता या प्रकरणात भाजपच्या नगरसेवकाच नाव आल्याने भाजप काय भूमिका घेते हे पाहणं तितकच महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
पुजा चव्हाण प्रकरण, भाजपच्या ‘या’ नगरसेवकाला पुणे पोलिसांनी बजावली नोटिस, म्हणाले…
‘त्या’ शेवटच्या पोस्टमध्ये पुजा चव्हाण म्हणते, नालायक लेखक भालचंद्र नेमाडे देशी दारू पिऊन…
पुजा चव्हाण प्रकरणी प्रश्न विचारताच पोलिस आयुक्त हसत हसत निघून गेले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.