“संजय राठोडांनी आपल्या कृत्याची कबुली द्यावी”, पुजा चव्हाणची आजी आक्रमक

बीड| पुजा चव्हाण आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.  पुजा चव्हाणच्या आत्महत्येला शिवसेना मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आज संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येत मला बदनाम करण्यात येत असल्याचं स्पष्ट केल आहे.

दरम्यान पुजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड  यांनी बीडमध्ये बोलत असताना मंत्री संजय राठोडांनी बंजारा समाजाची दिशाभूल करू नये. त्यांनी कृत्याची कबूली द्यावी. असं म्हणतं त्याच्यांवर निशाणा साधला आहे.

पुढे म्हणाल्या की, ७ ते २१ फेब्रूवारी पर्यंतची परळी शहरामधील सीसीटिव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी करावी. पुजाचा गर्भपात करून तिला यवतमाळमध्येच ठार मारण्यात आलं आणि पुण्यात तिच्या फ्लॅटवर नेऊन खाली ढकलण्यात आलं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
“गुन्ह्याची कबुली देण्यासाठी संजय राठोड पोहरादेवीला”
“मंत्री संजय राठोडनेच पुजा चव्हाणची हत्या केली”
माझी बदनामी थांबवा, माझे जीवन उद्ध्वस्त करू नका – संजय राठोड
पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोडांनी मौन सोडले; दिली ‘ही’ प्रतिक्रिया

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.