‘पुढचं पाऊल'(Pudhch Paul) या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री जुई गडकरीने(Jui Gadkari) एक धक्कादायक खुलासा केला आहे. जुईने आपल्या झालेल्या आजाराबद्दल माहिती दिली आहे. या आजाराचा सामना कशा पद्धतीने केला याची कहाणी तिने मांडली आहे. अभिनेत्री(Actress) जुई गडकरीने सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट(Post) शेअर केली आहे. या पोस्टच्या ‘ही माझीच गोष्ट आहे एकही शब्द खोटा नाही’ असे लिहिले आहे.(pudhch paul serial actress jui gadkari having this disease)
अभिनेत्री जुई गडकरीला RA (rheumotoid arthiritus) हा आजार झाला आहे. हा आजार auto immune disease आहे. या आजारात तुमची immune सिस्टीमच तुमच्या पेशींवर अटॅक करते. त्यामुळे तुमचे सांधे जॅम होऊ लागतात आणि हळूहळू शरीरातील एक-एक अवयव त्याचा परिणाम होतो, असे अभिनेत्री जुई गडकरीने सांगितले आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्री जुई गडकरीने तिची नाजूक बाजू देखील मांडली आहे. या आजारामुळे तिच्या गर्भाशयावर परिणाम झाल्याचे तिने सांगितले. या आजारामुळे तिला तिची दैनंदिन कामे देखील करता येत नव्हती. तिला ट्रेकिंग करायला फार आवडते. पण या आजारामुळे तिला ४ वर्षे ट्रेकिंग करता आले नाही. यामुळे तिला नैराश्य आले होते.
https://www.facebook.com/jui.gadkari.31/posts/10218221183759904
या आजारादरम्यान जुई ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत काम करत होती. काही काळाने या आजारामुळे तिला ‘पुढचं पाऊल’ ही मालिका सोडावी लागली होती. अभिनेत्री जुई गडकरी या दुर्मिळ आजाराचा जिद्दीने सामना करत आहे. या सगळ्यातून मार्ग काढत जुई आनंदाने आयुष्य जगत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.
सर्व महिलांनी जिद्दीने आणि आनंदाने आयुष्य जगा, असा सल्ला अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. या सोबत अभिनेत्री जुई गडकरीने आहार आणि व्यायामाकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. आहार आणि व्यायामामुळे आपल्याला या आजाराचा सामना करता आला, असे जुईने सांगितले आहे.
अभिनेत्री जुई गडकरीने फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री जुई गडकरी साडीमध्ये दिसत आहे. या फोटोत जुईच्या चेहऱ्यावर निखळ हास्य आहे. अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. लोक अभिनेत्री जुई गडकरीचे कौतुक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
आदित्य नारायणने मुलीला दिले ‘असे’ अनोखे नाव, तुम्हीही तुमच्या मुलीला देऊ शकता अशी अनोखी नावं
डोंबिवली रेल्वे स्थानकात जोडप्याला किस करताना पकडले, व्हायरल व्हिडिओवर नेटकरी संतापले
सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्यालाही टक्कर देते अनु मलिकची मुलगी, पहा तिचे कधीही न पाहिलेले सुंदर फोटो