Share

राजेशाही थाटात पार पडला PSI पल्लवी जाधवचा विवाह सोहळा, जाणून घ्या तिची संघर्षकथा..

नुकताच अभिनेत्री आणि पीएसआय पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आणि पीएसआय पल्लवी जाधव(Pallavi Jadhav) यांचा ‘हैदराबाद कस्टडी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पल्लवी जाधव यांनी प्रमुख भूमिका केली आहे.(PSI Pallavi Jadhav’s wedding ceremony)

अभिनेत्री आणि पीएसआय पल्लवी जाधव आणि कुलदीप यांच्या विवाह सोहळ्याच्या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर या पल्लवी जाधव आणि कुलदीप यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री आणि पीएसआय पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाह सोहळा औरंगाबादमध्ये झाला आहे.

अभिनेत्री आणि पीएसआय पल्लवी जाधव यांचे सोशल मीडियावर भरपूर फॉलोव्हर्स आहेत. अभिनेत्री आणि पीएसआय पल्लवी जाधव यांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील रेल हे आहे. पीएसआय पल्लवी जाधव यांचे वडील शेती करतात. पल्लवी जाधव यांचे पीएसआय बनण्याचे स्वप्न होते. हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत पल्लवी जाधव यांनी पोलीस दलात पीएसआय हे पद मिळवले.

पीएसआय परीक्षेसाठी अभ्यास करत असताना पल्लवी जाधव यांनी शेतमजुरी देखील केली आहे. पीएसआय पल्लवी जाधव यांना लहानपणापासून अभिनयाची वाद होती. त्यामुळे त्यांनी मॉडेलिंग करण्यास सुरवात केली. २०२० मध्ये त्यांनी जयपूर येथे झालेली ग्लॅमोन मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती. लवकरच त्या अभिनय क्षेत्रात देखील पदार्पण करणार आहेत.

एका मुलाखतीत पीएसआय पल्लवी जाधव यांनी आपला जीवन प्रवास सांगितला आहे. “लहानपणापासून मला हिरोईन बनायचं होतं. पण जशी जशी मोठी होत गेले तसं माझ्या लक्षात आलं की आपण ग्रामीण भागात राहतो. आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही. आपले आईवडील गरीब आहेत. त्यामुळे आपलं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही”, असे पीएसआय पल्लवी जाधव यांनी मुलाखतीत सांगितले.

“मी पोलीस अधिकारी बनायचं ठरवलं. मी तीन वर्ष मेहनत करून पोलीस दलातील पीएसआय पद मिळवलं. मी अनेकदा उपाशी राहून अभ्यास केला आहे. वर्दी हेच माझं पाहिलं प्रेम आहे”, असे देखील पीएसआय पल्लवी जाधव यांनी सांगितले. पीएसआय पल्लवी जाधव यांनी प्रमुख भूमिका केलेला ‘हैदराबाद कस्टडी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रिजभूषणला मोदींनी आवरावे अन्यथा…आता निर्वाणीचा इशारा
‘पवारांनी संस्कृतीवर बोलू नये, तुमची शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल’; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
‘फुलपाखरु’ फेम हृता दुर्गूळेने बॉयफ्रेंड प्रतिकसोबत बांधली लग्नगाठ; पहा लग्नाचे खास फोटो

ताज्या बातम्या इतर मनोरंजन

Join WhatsApp

Join Now