स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले आहे. या चित्रपटाने तिकीट बारीवर तीनच दिवसात तब्बल ८.७१ कोटींची विक्रमी कमाई केली आहे. (prvin tarde and raj thakre meeting )
प्रेक्षकांची आणि समीक्षकांची या चित्रपटाला मोठी पसंती मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी(Raj Thakare) देखील ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील माहिती दिली आहे. या मुलाखतीत दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना राज ठाकरेंच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, “एक दिग्दर्शक आणि अभिनेत्याची राजकारणातील चित्रपट प्रेमी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. आम्ही दीड-दोन तास गप्पा मारत होतो आणि राज ठाकरे साहेब फक्त चित्रपटांविषयी बोलत होते. मराठी चित्रपटांची पुढील वाटचाल, टेक्नॉलॉजी, व्हीएफएक्स यासंदर्भात या भेटीत चर्चा झाली”, असे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मुलाखतीत सांगितले.
दिग्दर्शक प्रवीण तरडे मुलाखतीत पुढे म्हणाले की, “आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या चित्रपटांनी कसं स्वतःच स्थान मिळवलं पाहिजे, याबद्दल भेटीत चर्चा झाली. राज ठाकरे रोज एक चित्रपट पाहून झोपतात. महाराष्ट्राला ही एक परंपरा हे… मग ते शरद पवार साहेब असतील, राज साहेब असतील, स्वतः बाळासाहेब ठाकरे चित्रपटाचे भक्त होते म्हणून कलाकारांवर त्यांचं प्रेम होतं.”
“त्यामुळे राज साहेबांच्या बोलण्यात चित्रपटाचे कॅमेरा, अँगल, लेन्सिंग ऍक्सेस असे विषय होते. यावेळी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरबद्दल चर्चा झाली. यावेळी त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले. मराठी चित्रपट जर या दर्जाला येत असेल तर याचं भविष्य आणि वाटचाल खूप चांगली आहे , असे राज ठाकरे भेटीदरम्यान म्हणाले”, असे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मुलाखतीत पुढे सांगितले.
‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका केली आहे. तसेच अभिनेता गश्मीर महाजनी यांनी छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटातील प्रवीण तरडे यांच्या अभिनयाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
‘तो खेळ बदलू शकेल एवढा मोठा खेळाडू नाही’, विश्वविजेत्या क्रिकेटरने रियान परागला फटकारले
अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहील्यानगर करून स्वाभिमानी मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध करा; पडळकरांचे आव्हान
मुंग्यांनी केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळेच देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली, खाणीत आहे २२ कोटी टन सोने