‘संविधानाच्या प्रतीवर गणपती बसवून लोकशाहीचा अपमान’

मुंबई | सर्वसामन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. परंतु, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी घरी गणपतीच्या केलेल्या प्रतिष्ठापनेवरून सोशल मीडियावर वाद पेटला आहे.

अजूनही हा वाद मिटलेला नाही. तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी ट्विट करत दिला आहे.

 

‘प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांनी संविधानाच्या प्रतीवर गणपती बसऊन लोकशाहीचा अपमान केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करावी ही विनंती, त्यांनी केली आहे.

दरम्यान, “माझ्या घरी पुस्तक गणपती अशी कॉन्सेप्ट होती. आणि बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सगळ्यात मोठं प्रतीक अशी माझी भावना होती. परंतु ती किती मोठी चूक आहे, हे माझ्या लक्षात अनेक लोकांनी आणून दिलं,’ असा माफीचा एक व्हिडिओ प्रवीण तरडेंनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.