VIDEO: पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा हॉट अंदाज, बिल्लो राणी गाण्यावर केला बेली डान्स

भारतीय संघाचा धडाकेबाज खेळाडू पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंग यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. ते दोघेही एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असताना दिसत असतात, त्यामुळे दोघांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु झाली होती.

अभिनेत्री प्राची सिंग ही सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असते. तसेच तिच्या चाहत्यांसाठी ती रोज वेगवेगळे फोटो पोस्ट करते असते. तसेच काही डान्सच्या व्हिडिओही पोस्ट करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

प्राचीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती आपल्या हॉट अंदाजात डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्राची बिल्लो राणी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

प्राचीने या व्हिडिओमध्ये बेली डान्स केला असून या डान्समुळे तिने तिच्या चाहत्यांची झोप उडवली आहे. प्राचीने या व्हिडिओला बॉली-मुड असे कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे.

प्राचीचा डान्स बघून चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ३० हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स असून ती नेहमीच पोस्ट करत तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती देत असते.

दरम्यान, प्राची आणि पृथ्वीची अफेरची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु असते. असे असले तरीही त्यांना आतापर्यंत एकत्र पाहिलेले गेलेले नाही. जेव्हा २०२० आयपीएलमध्ये पृथ्वी चांगला खेळत होता, तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत त्याला चीअर अप केले होते. इतके असूनही दोघांनीही आतापर्यंत कधीही आपल्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

बाबा रामदेव उतरले ई कॉमर्स क्षेत्रात; देणार फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला टक्कर
कर्मचाऱ्याने ऑफिसला गैरहजेरीचे दिले विचित्र कारण; स्वतःला भगवान विष्णूचा दहावा अवतार सांगितला
अंधश्रद्धेचा झाला कहर; कोरोना होऊ नये म्हणून ‘या’ गावात केली खंडीभर बोकडांची जत्रा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.