‘निलंबनासाठी वडील जबाबदार’, पृथ्वी शॉचा खळबळजनक खुलासा

मुंबई | भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ २०१९ साली डोप टेस्टमध्ये फेल झाल्याचे समोर आले होते. यानंतर या युवा खेळाडूवर १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत बंदी घालण्यात आली होती. पृथ्वी शॉ याचं तब्बल ८ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले होते. पृथ्वीने क्रिकबझसोबत बोलताना करियरमधल्या या कठीण काळाबद्दल सांगितले आहे.

यावेळी बोलताना तो म्हणाला, न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत मला सगळं ठिक आहे असं वाटत होतं. आयपीएलमध्येही मी चांगली कामगिरी केली होती. २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. तेव्हा माझ्या पायाला दुखापत झाली. यासाठी मी उपचारांना सुरुवात केली.

दरम्यान मी आयपीएल खेळलो. यानंतर कफ सिरपचा वाद समोर आला. मला वाटत मी आणि वडील याला जबाबदार आहोत. इंदूरमध्ये मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होतो, त्यावेळी मला सर्दी-खोकला होता.

रात्री जेवणासाठी मी बाहेर गेलो होतो, तेव्हा मला खूप खोकला येत होता. त्यावेळी वडीलांनी मला बाजारात उपलब्ध असलेलं कफ सिरप घ्यायला सांगितलं, पण फिजियोचा सल्ला न घेऊन मी मोठी चूक केली. असं पृथ्वी शॉने सांगितले.

दोन दिवस मी ते कफ सिरप घेतलं आणि तिसऱ्या दिवशी माझी डोप टेस्ट झाली. यानंतर मी प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनासाठी पॉझिटिव्ह आढळलो. माझ्यासाठी हा सगळ्यात कठीण काळ होता. या गोष्टी मी शब्दात सांगू शकत नाही.

मी स्वत:च्या प्रतिमेबाबत चिंतित होतो. लोकं माझ्याबद्दल काय विचार करत असतील ते मला काय म्हणतील यांसारख्या गोष्टी माझ्या मानात येत होत्या. मी लंडनला गेलो आणि तिकडे स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतलं. असे वक्तव्य पृथ्वी शॉने केले आहे.

भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी संघात पृथ्वी शॉला संधी मिळू शकते. भारतीय संघ याठिकाणी तीन वनडे आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
भुख लागली असेल बिनधास्त खा, पैसे देऊ नका; सोशल मीडियावर तमिळनाडुच्या फळविक्रेत्याची चर्चा
कलेक्टरने भररस्त्यात युवकाचा फोन तोडून मारली त्याच्या थोबाडीत; व्हिडीओ व्हायरल होताच कलेक्टर झाला ट्रोल
आनंद महिंद्रांनी शेअर केला एका आगाऊ बाळाचा व्हिडिओ; म्हणाले, हे बाळ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.