विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये पृथ्वी शॉचा झंझावात; ३९ चेंडूत ठोकल्या ७३ धावा

नवी दिल्ली | दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर विजय हजारे ट्रॉफीचा फायनल सामना मुंबई आणि उत्तर प्रदेश संघामध्ये खेळला गेला. या फायनलमध्ये मुंबई संघाने उत्तर प्रदेशवर विजय मिळवला आहे. या सामन्यात कर्णधार पृथ्वी शॉने तुफान फटकेबाजी केली आहे.

पृथ्वी शॉ सामना सूरू असतानाचं दुखापतग्रस्त झाला होता. असे असतानाही त्याने उत्तर प्रदेशविरूध्द ७३ धावांची खेळी केली. ३९ चेंडूत त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले आहेत. तसेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये ८०० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

उत्तर प्रदेश संघाने ३१२ धावांच आव्हान मुंबईसमोर ठेवलं आहे. उत्तर प्रदेश संघातील फलंदाज माधव कौशिकने १५८ धावांची नाबाद खेळी केली होती. टीममधील ४ खेळाडूंनी ३१२ रन्स केले होते. त्यात माधव कौशिक याचे १५० हून अधिक रन्स आहेत.

पृथ्वी शॉला दुखापत झाल्याने त्याला फायनल खेळता येणार नाही. असं मुंबईच्या चाहत्यांना वाटले होते. पण पृथ्वी मैदानात उतरला आणि त्याने विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. युवा खेळाडू पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीत धडाकेबाज कामगिरी करत भारतीय संघातील मोठ्या खेळाडूंनी केला नाही असा इतिहास रचला आहे.

महत्वाच्या बातम्या-
२४ चेंडू खेळला पण खातं उघडल नाही, अन् सामना संपेपर्यंत एकट्याने चोपल्या तब्बल १५८ धावा
सोनम कपूरच्या छोट्या बहीणीने शेअर केले बिकनीतील फोटो; सोशल मिडीयावर रंगली चर्चा
आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने खळबळ
रिषभ पंतने जोफ्रा आर्चरला मारलेला डोळ्याचं पारणं फेडणारा रिव्हर्स स्विपचा षटकार पाहीलात का?

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.