सरनाईकांना मनी लॉंड्रिंग प्रकरण चांगलेच येणार अंगलट; ईडीच्या अहवालात गंभीर आरोप

मनी लाँड्रिंगच्या संशयावरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. त्यामुळे ते अडचणीत होतेच. पण त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे कारण ईडीच्या अहवालात गंभीर त्यांच्यावर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. सरनाईक यांचे मित्र अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी म्हणुन ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

कोठडी अहवालात ईडीतर्फे थेट सरनाईक यांचेच नाव घेतले आहे. ईडीच्या सहाय्यक संचालक अर्चना सलाये यांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला. चंडोळे यांना दोन दिवसांच्या चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आले आहे.

सरनाईक यांचे जुने निवासस्थान व समता नगरच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात चंडोळे राहतात. चंडोळे हे आमदार प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र आहेत. सरनाईक यांच्यासोबत ते डोंबिवलीहून ठाण्यात आले होते.

ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार ईडी कोठडी अहवाल तयार केला आहे व त्यात प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. आता यामुळे सरनाईक आणखीनच अडचणीत येणार आहेत.

वाह! ६० म्हशींचा सांभाळ अन् २ मजल्यांचा गोठा, पारनेरच्या श्रद्धाचा थक्क करणारा प्रवास!

मनोजकुमारने डिंपलला रात्री १२ वाजता फोन करून हाॅटेलवर बोलावले व दिली ‘ही’ आॅफर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.