अभिमानास्पद ! ‘भारतीय’ वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मान

सिंगापूर | सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या काळात पुढे येऊन कोरोना व्हायरसशी लढा देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसमध्ये एक भारतीय वंशाची नर्ससुद्धा होती.

कोरोना काळात लढा देणाऱ्या या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. पाच नर्सेसना हा पुरस्कार देण्यात आला. त्यात भारतीय वंशाच्या कला नारायणसामीसुद्धा होत्या.

या सर्व नर्सेसना सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांनी स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्रक, एक ट्रॉफी आणि १० हजार सिंगापूर डॉलर्स देण्यात आले. नारायणसामी या वूड्सलँड्स हेल्थ कॅम्पसमध्ये नर्सिंगच्या उपसंचालिका आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. या उपाययोजना त्यांनी २००३ साली सार्सच्या साथीच्या रोगाच्या वेळी शिकल्या होत्या.

नारायणसामी सध्या २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या वूडलॅन्ड हेल्थ कॅम्पसच्या नियोजनात सहभागी आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, मी पुढील पिढतील नर्सेसला तयार करेल. मी नेहमीच आमच्या नर्सेसला सांगते नर्सिंग तुम्हाला कधीच पुरस्कृत करण्यात अपयशी ठरणार नाही.

२००० साली नर्सेसना पुरस्कार देण्यात सुरुवात करण्यात आली होती. त्यांच्या कामगीरीची प्रशंसा होऊ लागली. आतापर्यंत ७७ नर्सेसना पुरस्कार देण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.