Share

अभिमानास्पद! आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर झळकले ‘धर्मवीर’; पहा खास व्हिडीओ

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले चित्रपटाचे 30 फुटी कट आऊट सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेतच पण आता एका नव्या मराठी चित्रपटाची भर पडल्याचं पहायला मिळात आहे. अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) आनंद दिघे यांची भूमिका असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले असून त्यांचा पहिला लुकसमोर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत अधिकच उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.(proud-dharmaveer-flashes-asias-largest-hoarding-watch–special-video)

मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे 16800 स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतू आता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत असून या भागातून जाणा-या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाश्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत आहे. सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा बघायला मिळत आहे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तीमत्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या आनंद दिघे यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे. या चित्रपटाचे हे होर्डिंग बघताना ‘आभाळासम भासे धर्मवीर’ असाच भाव सर्वांच्या मनात उमटत आहे. नुकताच या चित्रपटाचा ‘ट्रेलर लाँच’ सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला आणि प्रविण तरडे (pravin tarde) यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अजित पवारांवर टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली; म्हणाले, मग पवार कोणाची अवलाद?
नवनीत राणा-मुख्यमंत्र्यांच्या वादात अब्दुल सत्तारांची उडी; राणांना ओपन चॅलेंज देत म्हणाले…
रणरणत्या उन्हात आदित्य ठाकरेंनी गावकऱ्यांसोबत खालीबसून केली चर्चा; म्हणाले, एकत्र काम करुया

मनोरंजन ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now