Share

Milind Deora on South Mumbai: “दक्षिण मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये”; शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले,…

Milind Deora on South Mumbai:  मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला नवा वळण मिळाल्यानंतर आता दक्षिण मुंबईतील (South Mumbai) आंदोलनावरून राजकीय वादंग पेटला आहे. शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इंग्रजी भाषेत पत्र लिहून, दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी देऊ नये किंवा ते स्थलांतर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

यापूर्वी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आझाद मैदानात ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केलं होतं. उच्च न्यायालयाच्या (High Court) हस्तक्षेपानंतर सरकार आणि आंदोलक यांच्यात तोडगा निघाला. सरकारने आठपैकी सहा मागण्या मान्य करत आंदोलन संपुष्टात आणलं. तरीदेखील काही आंदोलक दक्षिण मुंबईत ठिय्या देऊन बसले होते.

या घडामोडींवर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आंदोलकांना पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन केलं. मनसेकडून तर मुंबईकर अमराठी लोकांना सहन करतात, मग मराठी माणूस आल्यावर त्रास मानण्याचं कारण नाही, असं सांगण्यात आलं होतं.

मात्र, मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आपल्या पत्रात वेगळी भूमिका घेतली. त्यांनी लिहिलं की, दक्षिण मुंबई हे राज्याचं प्रशासनिक, राजकीय आणि आर्थिक केंद्र आहे. येथे मंत्रालय, विधानसभा, मुंबई महापालिका मुख्यालय, पोलीस विभाग तसेच नौदलाचं महत्त्वाचं ठाणं आहे. त्याचबरोबर देशातील अग्रगण्य वित्तीय संस्था, कॉर्पोरेट मुख्यालय आणि महत्वाच्या पायाभूत सुविधा या भागात आहेत, ज्यावर लाखो लोक दररोज अवलंबून आहेत. वारंवार निदर्शनांमुळे या सर्व ठिकाणी कामकाज विस्कळीत होतं, ही बाब चिंताजनक आहे.

देवरा यांनी स्पष्ट केलं की, जगातल्या कोणत्याही राजधानी शहरात प्रशासन, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य संस्थांना निदर्शनांमुळे ठप्प होऊ दिलं जात नाही. निदर्शनांचा अधिकार मान्य असला तरी, तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणणारा नसावा. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अशा आंदोलने उच्च सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या क्षेत्रांपासून दूर ठेवावीत किंवा त्यांना अन्यत्र स्थलांतरित करावं, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली.

देवरा यांच्या या भूमिकेवर सोशल मीडियात टीकेची झोड उठली आहे. “मराठी विरोधी मानसिकता”, “पोटदुखी” अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मराठी माणूस एकवटल्यानेच काहींना अस्वस्थता आली असल्याची टिप्पणी केली.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now