भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मैदानात आंदोलकांची घुसखोरी, अदानी ग्रुप विरोधात केली निदर्शने

सिडनी | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सिडनी क्रिकेट मैदानावर दोन आंदोलकांनी घुसखोरी केली. त्यातील एकाच्या हातात अदानी समूहाविरूद्धचे फलक होते.

निदर्शक भारतीय ऑस्ट्रेलियाच्या अदानी समूहाच्या कोळसा प्रकल्पाचा निषेध करत होते. निषेध करणार्‍यांच्या टी-शर्टच्या समोरील बाजूने “#stopadani” असे लिहिले होते. त्यातील एक खेळपट्टीच्या जवळ पोहोचला आणि भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी ऑस्ट्रेलियाच्या डावातील सहावा षटक टाकत होता.

नंतर अनेक वादानंतर दोघांना सुरक्षारक्षकांनी बाहेर काढले. आश्चर्याची बाब म्हणजे, इतका हाय-प्रोफाइल सामना सुरू असताना आंदोलक घुसले कुठून तसेच यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

फॉक्स स्पोर्ट्सलॅब बोलताना अ‍ॅडम गिलक्रिस्ट म्हणाले, मैदानावर आंदोलनकर्ते काही गोष्टींबद्दल निषेध करीत होते. आम्ही सुरक्षारक्षक येण्याची वाट पाहत होतो पण बराच वेळ झाला तरी कोणीच त्यांना बाहेर काढण्यासाठी आले नाही.

स्टॉप अदानी या नावाने निषेध करणार्‍या लोकांचा गट सामना सुरू होण्यापूर्वी एससीजीच्या बाहेर जमा झाला होता. स्टॉप अदानी या संस्थेने निवेदनात म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट दौर्‍याचा पहिला सामना पाहणारे लाखो भारतीय करदात्यांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे की भारतीय स्टेट बँक कोट्यावधींचा कर हा एका कोळशाच्या खाणीला देण्याचा विचार करीत आहे.

ऑस्ट्रेलियाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन टी -२० आणि चार कसोटी सामने सिडनी येथे शुक्रवारी खेळले जाणार आहेत. या सर्व प्रकारामुळे अदानी ग्रुप आणि स्टेट बँकेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

हायकोर्टाचा शिवसेनेला दणका; कंगणाच्या ऑफीसवरची कारवाई अवैध, भरपाई द्या

८० तास टिकलेल्या सरकारच्या स्थापनेमागील सर्व सत्य आले समोर; राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.