भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC देशातील सर्वात मोठा IPO आणणार आहे. ४ मे २०२२ रोजी LIC चा IPO भारतीय शेअर बाजारात दाखल होणार आहे. गुंतवणूकदारांना ९ मे २०२२ पर्यंत या IPO मध्ये सहभाग घेता येणार आहे. अनेक गुंतवणूकदारांना एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावे की नाही? हा प्रश्न पडला आहे.(Profit or Loss of Investing in LIC Shares? Learn the advice of financial experts)
एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यामुळे फायदा होईल की तोटा? या प्रश्नाचे उत्तर आम्ही येथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. LIC चा IPO बाबत आर्थिक तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे असल्याचे अनेक आर्थिक तज्ज्ञांनी सांगितले आहे. गेल्या काही काळापासून LIC कंपनी नफ्यात आहे.
तसेच शेअर बाजारामध्ये LIC चा IPO कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी कंपनीत भाग घेण्याची संधी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झाली आहे. गुंतवणूकदारांनी LIC चा IPO विकत घेण्याची संधी गमावू नये, असे मत आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
तर काही आर्थिक तज्ज्ञांनी IPO मध्ये शेअर्स घेण्याऐवजी गुंतवणूकदारांनी त्याचे शेअर्स सूचीबद्ध होण्याची प्रतीक्षा करावी, असे मत नोंदवले आहे. सूचीबद्ध झाल्यानंतर LIC च्या शेअर्सचा काही काळ गुंतवणूकदारांनी अभ्यास करावा आणि त्यानंतर शेअर्स खरेदी करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे काही आर्थिक तज्ज्ञांनी सांगितले आहे.
LIC च्या IPO द्वारे केंद्र सरकारची या कंपनीतील ३.५ टक्के हिस्सेदारी विकण्याची योजना आहे. या IPO च्या माध्यमातून केंद्र सरकारला शेअर बाजारातून२०,५५७.२३ कोटी रुपये उभे करायचे आहेत. या IPO मार्फत LIC कंपनीने 22.13 कोटी शेअर विक्रीस ठेवले आहेत. LIC कंपनीच्या 3.5 टक्के समभागांची निर्गुंतवणूक केली जाणार आहे.
४ मे पासून गुंतवणूकदारांना LIC चा IPO विकत घेता येणार आहे. ही मुदत ९ मे २०२२ पर्यंत राहणार आहे. या IPO साठी कंपनीने प्रति शेअर ९०२ ते ९४९ रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. या IPO मध्ये LIC कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी १५,८१,२४९ कोटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच २,२१,३७,४९२ कोटी शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
ज्योतिष अभ्यासकांची देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘२०२३ नंतर सत्तेच्या जवळ…’
‘या’ चित्रपटाची शुटींग पुर्ण होईपर्यंत अनेक कलाकारांचा झाला मृत्यु, २३ वर्षांनी झाला होता प्रदर्शित
अजय-सुदीपच्या वादावर प्रसिद्ध निर्मात्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘साऊथ स्टार्सवर जळतात हिंदी स्टार्स’