निर्मात्याने अंकिता लोखंडेकडे केली नको ती मागणी; तिचे उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खास करून अभिनेत्रींना. त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना समोरे जावे लागते. एवढेच नाही तर त्यांना कास्टिंग काऊचसारख्या गोष्टीचा देखील सामना करावा लागतो.

फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी आजपर्यंत कास्टिंग काऊचचे अनुभव सांगितले आहेत. तर अनेकांना या गोष्टी विरोधात आवाज उठवला आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना याचा सामना करावा लागला होता.

फिल्म आणि टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेने एका मुलाखतीमध्ये तिच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत हा धक्कादायक प्रकार उघड केला आहे.

अंकिताने सांगितले की, ‘करिअरच्या सुरुवातीला ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. त्यावेळी तिला खुप मेहनत करावी लागली होती. याच कालावधीमध्ये तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता’.

ती म्हणाली की, ‘मी एका साऊथ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले होते. त्यावेळी चित्रपटाच्या निर्मात्याने मला एका रुममध्ये बोलवले आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याने मला तुला कॉम्प्रेमाईझ करावे लागेल. तु तयार आहेस ना? असा प्रश्न केला’.

‘हा प्रश्न ऐकल्यानंतर सुरुवातीला मला धक्का बसला. पण त्यानंतर मात्र मी शांत न बसला त्याला सडेतोड उत्तर दिले. मी म्हणाले की, तुम्हाला चित्रपटासाठी हुशार अभिनेत्री नाही तर झोपण्यासाठी मुलगी हवी आहे. हे ऐकल्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली आणि मला चित्रपटात काम दिले. पण त्यावेळी मी चित्रपटाला नकार दिला’.

अंकिता लोखंडे इंडियन टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून तिला घराघरात ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर अंकिता सुशांत सिंग राजपूतमूळे चर्चेत आली होती. दोघे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूनंतर ती चर्चेत आली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून अनिल अंबानीचे स्थळ घेऊन ऐश्वर्या रायच्या घरी गेले होते अमिताभ बच्चन

‘तारक मेहता’ मालिकेतील जिवलग मित्र तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयूष्यात आहेत दुश्मन

ज्या मैत्रिणीने वाईट दिवसांमध्ये मदत केली; त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत होते स्मृती इराणीचे अफेअर

असे काय झाले की, जिगरी यार मनोजकुमार आणि प्राणची मैत्री तुटली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.