निर्माता करण जोहरने सांगितली आयुष्यातील सर्वात मोठी भीती; या गोष्टीमुळे निर्माण होतात अनेक समस्या..

अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये शो होस्ट करताना दिसतील. जिथे यावेळी करण आपल्या बुद्धी आणि हुशारीने सर्वांचे मनोरंजन करेल. सर्वाना माहीतच असेल करण लवकरच बिग बॉस ओटीटी होस्ट करताना दिसणार आहे. सध्या आता भारतातील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस OTT चे काऊंटडाउन सुरु झाले आहे.

चित्रपट निर्माता असण्याव्यतिरिक्त हा अभिनेता एक महान पिता देखील आहे. करण जोहर त्याच्या दोन मुलांवर खूप प्रेम करतो. करण आपली दोन मुले यश आणि रुहीसोबत बराच वेळ घालवतो. त्याचे संपूर्ण सोशल मीडिया यश आणि रुहीच्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी भरलेले आहे.

करण आपल्या मुलांपासून दूर जाण्याचा विचार करूनही थरथरतो. अलीकडे जेव्हा त्याला विचारले गेले की त्याला सर्वात जास्त कशाची भीती वाटते, त्याने प्रत्येक वडिलांप्रमाणे उत्तर दिले की त्याची सर्वात मोठी भीती आपल्या मुलांपासून दूर राहणे आहे. तो म्हणाला की माझा सर्वात मोठा फोमो म्हणजे माझ्या मुलांपासून दूर राहणे. माझे सर्व सुख त्यांच्यामुळे आहे. ज्यामुळे मी त्याच्यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही.

जरी ही गोष्ट करणचा फोमो आहे, पण करणच्या एनर्जीशी कोणीही तुलना करू शकत नाही. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आपल्याला माहितच आहे, करण जोहर प्रत्येक बॉलिवूड पार्टीचा एक भाग आहे. तो पहाटे ४ पर्यंत पार्टीत राहतो, पण तो त्याच्या वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचतो.

आजकाल करण त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहे. करण बऱ्याच काळानंतर पुन्हा दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. करण लवकरच त्याचा पुढील चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चे दिग्दर्शन सुरू करेल. या चित्रपटात आपल्याला रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहोत.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: Karan Johar to direct Ranveer Singh, Alia Bhatt in new love story | Bollywood News – India TV

तसेच असे समजले आहे की या चित्रपटात आपण बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकारही बघणार आहोत ज्यात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी दिसतील. करणची संपूर्ण टीम या चित्रपटावर काम करण्यात मग्न आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित होईल.

हे ही वाचा-

गणपती-दिवाळीत यंदाही शुकशुकाट; ऑक्टोबरमध्ये कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण होणार

पूजा लोंढे हत्या प्रकरणी माहेर सिन्नरमध्ये तीव्र आक्रोश, नागरिक रस्त्यावर, नराधमांवर कारवाईची मागणी

..तेव्हा संजय राऊत ततपप करत बाथरूममध्ये लपले होते; राणेंनी केला गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.