…म्हणून ‘या’ गावात थाटामाटात काढली सेवानिवृत्त झालेल्या जवानाची मिरवणूक, पाहा व्हिडिओ

भारतात देशसेवेतील जवानांच्याबद्दल आदर अभिमान व्यक्त केला जातो. ते आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करत असतात. अनेकजण या देशसेवेत शहीद देखील होतात. यामुळे सर्वांनाच त्यांचा अभिमान असतो. सध्या सोशल मीडियावर एका जवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मधील फडतरवाडीचा आहे. येथील महेश विश्वनाथ फडतरे हे देशसेवेची सेवा करून निवृत्त झाले. यामुळे या गावात गावकऱ्यांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली. आणि त्यांचे स्वागत केले. यामुळे ते देखील भारावून गेले होते.

हलगी आणि घोड्यावर त्यांची मिरवणूक काढल्याचा त्यांच्या व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. घोड्यावर बसून संपूर्ण गावात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

जवानांचे महत्त्व हे युवा पिढीला समजण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल आणि अनेकजण आपल्या देशाची सेवा करताना मागेपुढे बघणार नाहीत, असे यावेळी API मिलिंद फडतरे यांनी सांगितले.

गावातील माजी सैनिकांनी महेश फडतरे यांचा सत्कार केला. यावेळी अनेकांनी त्यांना कामाचे अनुभव विचारले. त्यांनी १७ वर्ष देशसेवा केली. अखेर ते आता निवृत्त होऊन आपल्या गावी परतले आहेत. गावकऱ्यांसह सर्वांना त्यांचा अभिमान आहे.

ताज्या बातम्या

सियाचीनच्या थंडीत ड्युटीचा शेवटचा दिवस, घरी येण्यासाठी निघताना घात झाला, महाराष्ट्राच्या सुपुत्राचा दुर्दैवी मृत्यू

अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले ‘एवढ्या’ कोटींचे मालक, जाणून घ्या, तरुणांची प्रेरणादायी कथा

धक्कादायक! तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.