ठाकरेंना कणा नाही, गुन्हेगारी वृत्तीचे हे सरकार बरखास्त करून राज्यात नवीन सरकार आलं पाहीजे

मुंबई : ‘ठाकरे सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून राज्यात नवं सरकार आलं पाहिजे. उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षांमध्येही सत्तेत होते. या गोष्टी त्यांना माहिती नाहीत, असे नव्हे. पण उद्धव ठाकरे यांना कणा नाही. त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत, अशी टीका  वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘खाजगी रुग्णालयांमधील कोरोना चाचणीचं रॅकेट सुरू झालं त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह आल्याचा प्रकार अमरावतीत समोर आला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार ८० % लोक यांना सिमटम्स नाहीत. ते लोक घरात राहू शकतात असं म्हणणं आहे.  लॉकडाऊन असतांना सुद्धा रुग्ण संख्या वाढलीय. लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॉकडाऊनला माझा विरोध आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, ‘पंतप्रधान मोदींच आदेशांची पायमल्ली करत आहेत. तिथं एकाही पोलिसांनी मोदींवर केस केली नाही.   माझं आवाहन आहे त्यांनी मोदींवर केस करून दाखवावी. बंगालच्या लोकांना मोदी वारंवार तिथं जाऊन त्यांना डिवचत आहेत. ज्या ज्या वेळी तिथं जाऊन प्रचार करतील तेव्हा ममता यांच्या पाच सीट वाढत जातील, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र; वाचा जसंच्या तसं

पंतप्रधान मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर तुफान हिंसाचार; हिंदू मंदिरांवर हल्ला

खाजगी रुग्णालयांमधील कोरोना चाचणीच्या रॅकेटची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.