‘जनतेने १०० टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी द्यावी’

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

याचाच धागा पकडत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. ‘लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. १०० कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘जनतेने १०० टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी  द्यावी, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

‘आमचे काही चालत नाही, आमचे कोणी ऐकत नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेस पक्षाने आता आपली इभ्रत राखण्यासाठी या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे. पडायचे की तिथेच खितपत पडायचे याचा निर्णय करावा, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

तुम्ही निवडणूक जिंकायच्या कॅटेगरीत बसत नाही म्हणत पवारांनी नाकारले होते तिकीट; आज गृहमंत्री केलं

वाझे कोणाला किती पैसे द्यायचा? एआयएला भेटली सगळी कागदपत्रे; होणार सगळी पोलखोल

अनिल देशमुख यांची विकेट घेणाऱ्या ऍड. जयश्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.