Yuvraj Sing- Priyansh Arya: आशिया चषक 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) हिने जोरदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला. या यशामागे भारतीय क्रिकेटचा माजी स्टार युवराज सिंग (Yuvraj Singh) यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
अभिषेक शर्माने अनेक मुलाखतीत सांगितले की, युवराज सिंगने त्याला फक्त क्रिकेटच नाही तर वैयक्तिक जीवनातही मदत केली आहे. “माझ्या यशामागे युवराज सिंगांचा मोठा वाटा आहे,” असे अभिषेक म्हणाला. याशिवाय माजी भारतीय कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) यालाही युवराजने प्रशिक्षण दिले आहे. आशिया चषकात शुभमन गिलचीही कामगिरी दमदार होती.
अभिषेक शर्मानंतर आता युवराज सिंगने आणखी एका आक्रमक फलंदाजावर लक्ष केंद्रित केले आहे. हा खेळाडू म्हणजे प्रियांश आर्य (Priyansh Arya). सध्या प्रियांश आर्यला युवराज सिंग मार्गदर्शन करत आहेत. प्रशिक्षणाच्या दरम्यानचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या प्रियांश ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळत आहे.
दिल्ली प्रीमियर लीग (DPL 2024) मध्ये प्रियांश आर्यने नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्ध दक्षिण दिल्ली सुपरस्टार्ससाठी खेळत एका षटकात सहा षटकार ठोकले. त्याच्या संघाने 20 षटकांत 308/5 अशी धावांची उंची गाठली. आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) ने त्याला 3.80 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात समाविष्ट केले.
प्रियांश आर्य आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 2025 च्या हंगामात त्याने पंजाब किंग्जसाठी 39 चेंडूत विस्फोटक शतक झळकावले. यापूर्वीचा रेकॉर्ड युसूफ पठाण (Yusuf Pathan) ह्याचा होता, ज्याने 2010 मध्ये 37 चेंडूत शतक पूर्ण केले होते.