…म्हणून प्रियंका चोप्राने दोन चित्रपटांनंतर सलमान खानसोबत काम केले नाही

इंडस्ट्रीतील काही जोड्या नेहमी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतात. पहील्याच चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळते. पण नंतर मात्र ती जोडी परत कधीच एकत्र काम करत नाही. अशीच एक जोडी म्हणजे सलमान आणि प्रियंका चोप्राची.

सलमान आणि प्रियंकाने ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. चित्रपटासोबतच चित्रपटातील गाणे देखील हिट झाले होते. सलमान आणि प्रियंकाची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली होती.

सलमान आणि प्रियंकाच्या जोडीचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता. पण या दोघांनी जास्त चित्रपटांमध्ये एकत्र काम केले नाही. मुझसे शादी करोगीनंतर दोघे ‘सलामे इश्क’ चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. पण या चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांशी बोलत देखील नव्हते.

त्यानंतर देखील दोघांना एकत्र अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यांनी मात्र एकत्र काम करणे टाळले. इंडस्ट्रीतील लोकांचे म्हणणे आहे की, सलमान आणि प्रियंकाची मैत्री सुरुवातीपासूनच खुप कमी होती. पहील्या चित्रपटाच्या सेटवरच दोघांचे भांडण झाले होते.

मुझसे शादी करोगी चित्रपटाच्या शुटींग वेळी प्रियंका चोप्राचे नाव अक्षय कुमारसोबत जोडले जात होते. पण सलमान आणि अक्षयमध्ये त्यावेळी चांगले संबंध नव्हते. त्या दोघांमध्ये अनेक गोष्टीवरुन वाद व्हायचे. दोघांच्या भांडणाचे किस्से व्हायरल व्हायचे.

अक्षय आणि प्रियंकाचे रिलेशनशिप होते. त्यामूळे सेटवर दोघे एकत्र टाईम स्पेंड करायचे. दोघांना एकमेकांसाठी टाईम हवा होता. या सर्व गोष्टीमूळ चित्रपटाच्या शुटींगवर फरक पडत होता. शुटींगमध्ये त्रास होत होता. त्यामूळे सलमान चिडला. त्याने प्रियंकाला त्रास द्यायला सुरुवात केली.

सलमान खान प्रियंका चोप्राला चिडवायचा. सुरुवातीला तिने दुलर्क्ष केले. पण नंतर मात्र तिला या गोष्टीचा राग आला आणि तिने सलमानला असे वागण्यापासून थांबवले. पण सलमान ऐकत नव्हता. शेवटी दोघांचे भांडण झाले. दोघांचे भांडण खुप जास्त वाढले.

त्या दिवसापासून दोघांनी बोलणे बंद केले. शेवटी त्यांनी एकत्र काम करणे देखील बंद केले. अनेक वर्षांनंतर सलमानने प्रियंकाला एका चित्रपटाची ऑफर दिली होती. पण तिने चित्रपटाला नकार दिला. त्यामूळे सलमानचा इगो हर्ट झाला. त्याने परत कधीच प्रियंकासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या –

अभिज्ञा भावेचा रेट्रो लुक ठरला सोशल मिडीयावर चर्चेचा विषय; पहा फोटो

‘आशिका बनाया आपने’ फेम तनूश्री दत्ताचा हॉट अंदाज; इंग्रजी गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

नशेत धुंद धर्मेंद्रने मंत्र्याच्या पत्नीला केले होते जबरदस्ती किस; झाला होता मोठा तमाशा

काय सांगता! एकाच वेळी दोघींना डेट करत होते बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा; बघा कोण होत्या ‘त्या’ दोघी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.