प्रियांका अमेरिकेत विकतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून डोळे होतील पांढरे..

प्रियांका चोप्रा लग्न करून सध्या अमेरिकेत राहते. तिने भारतात लग्न केले होते. आता तीने अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट सुरु केले आहे. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ असे आहे. यामध्ये अनेक वेगवेगळे भारतीय पदार्थ मिळतात. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

हे रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये आहे. यामध्ये भारतात लोकप्रिय असलेले पाणीपुरी, डोसा, कुल्चा ते अनेक अनेक पदार्थ आहेत. अनेक मोठे सेलिब्रिटींनी याठिकाणी हजेरी लावत आहेत. लोकप्रिय निर्मात्या आणि थेटरसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोला जेम्स यांनी देखील आता प्रियांकाच्या सोना या रेस्टॉरंटला भेट दिली आहे.

यावेळी त्यांनी आपल्या सर्वांचा आवडता वडापाव खाल्ला. याशिवाय लोलाने भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. या विषयी सांगत लोलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ‘यात आश्चर्य नाही न्यूयॉर्कमध्ये असलेले हे सोना अप्रतिम आहे.

या रुचकर आणि चविष्ट जेवणाकडे एकदा नजर टाका, अशा आशयाचे कॅप्शन लोलाने हे फोटो शेअर करत दिले आहे. यामुळे या रेस्टॉरंटची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेत देखील भारतीय वडापाव सर्वांना भुरळ घालत आहे. हे पदार्थ अनेकांच्या पसंतीस पडत आहेत.

असे असले तरी हे पदार्थ मात्र मोठ्या प्रमाणावर महाग आहेत. प्रियांकाच्या सोनामध्ये एका वडा पाव खाण्यासाठी तुम्हाला १४ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास १ हजार रुपये मोजावे लागतील. प्रियांकाच्या रेस्टॉरंटमध्ये वडा पाव मिळतो हे आधी कोणाला माहित नव्हते, आता मात्र तुम्हाला किंमतही माहिती झाली आहे.

वडापाव हा न्यूयॉर्कमध्ये ही लोकांच्या मनावर राज्य करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे प्रियांकाने आपला वडापाव सातासमुद्रापार नेला असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रियांकाने आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून देखील सगळीकडे नाव केले आहे.

ताज्या बातम्या

आशिष शेलारांनी पुरावा देत ठाकरे सरकारला पाडले तोंडघशी, म्हणाले, विमानतळ हस्तांतराचा ठराव..

सोनू सुदच्या शिरपेचात मानाचा तुरा! ऑलिम्पिक मूवमेंटचा ब्रँड एम्बेसेडर बनून करणार टीम इंडियाचे नेतृत्व

‘जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील’ असे म्हणत बंदुक घेऊन काढला व्हिडीओ, पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.