आईला घाबरुन प्रियंकाने तिच्या बॉयफ्रेंडला कपाटात लपवले होते; आईला समजल्यावर केली होती धुलाई

प्रियंका चोप्रा फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. तिला इंटरनॅशनल स्टार म्हणून ओळखले जाते. बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री झाल्यानंतर प्रियंका सध्या हॉलीवूडमध्ये काम करत आहे. प्रियंकाने हॉलीवूडमध्ये देखील चांगलीच प्रसिद्ध मिळवली आहे.

२००० मध्ये मिस इंडीयाचा ताज जिंकणाऱ्या प्रियंकाचा जन्म एका साध्या कुटूंबामध्ये झाला होता. तिने अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार केला नव्हता. पण एका स्पर्धेने प्रियंकाचे नशीब बदलले. ती मिस इंडीया स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला प्रियंकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पण तिने प्रत्येक अडचणीला तोंड दिले. अनेक वर्ष मेहनत केल्यानंतर प्रियंकाला इंडस्ट्रीमध्ये यश मिळाले होते. तिचा हा संघर्ष प्रियंका एका पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहे.

प्रियंका चोप्राने स्वत: ची बायोग्राफी लिहीली आहे. प्रियंकाने तिच्या ह्या पुस्तकामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने तिच्या आयूष्यातील अनेक रहस्य पुस्तकाच्या माध्यमातून लोकांना सांगितली आहेत. आज आपण यातील काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

दिग्दर्शकाने प्रियंकासोबत केले गैरवर्तन – प्रियंकाने तिच्या करिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम केले होते. पण एका दिग्दर्शकासोबत काम करताना तिला खुप वाईट अनूभव आला होता. ज्यामूळे प्रियंकाने तो चित्रपट सोडून दिला होता.

प्रियंकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘मला दिग्दर्शकाने गरज नसताना देखील बिकनी घालायला सांगितले होते. ती गोष्ट मला आवडली नाही. म्हणून मी तो चित्रपट सोडून दिला होता. त्यानंतर मी परत कधीच त्या दिग्दर्शकासोबत काम केले नाही’.

बॉयफ्रेंडला लपवले होते कपाटात – फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर प्रियंकाचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. शाहिद कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान, ह्रतिक रोशन अशा अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत तिचे अफेअर होते. पण अभिनय क्षेत्रात येण्याअगोदरही प्रियंकाला बॉयफ्रेंड होता.

कॉलेजमध्ये असताना प्रियंकाला बॉयफ्रेंड होता. तो तिला भेटण्यासाठी घरी आला होता. पण थोड्या वेळाने प्रियंकाची आई  घरी आली. आईला घाबरुन प्रियंकाने त्यावेळी बॉयफ्रेंडला कपाटात लपवून ठेवले होते. ही गोष्ट आईला समजल्यानंतर तिने मार देखील खाल्ला होता.

दिग्दर्शकाने सर्जरी करायला सांगितले होते – मिस इंडीयाची स्पर्धा जिंकल्यानंतर प्रियंका अभिनय क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तिला बॉलीवूडच्या एका मोठ्या दिग्दर्शकाने छातीची सर्जरी करायला सांगितले होते. ही गोष्ट ऐकल्यानंतर प्रियंका खुप चिडली होती. तिने इंडस्ट्रीपासून दुर जाण्याचा विचार केला.

नेपोटिझमचा शिकार झाली होती प्रियंका – नेपोटिझमचा वाद सध्या खुप चर्चेत असला तरी, खुप वर्षांपासून बॉलीवूडमध्ये नेपोटिझम सुरु आहे. प्रियंकाने तिच्या करिअरच्या सुरुवातील नेपोटिझमचा सामना केला होता. वैतागून तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी तिच्या आईने तिची मदत केली.

प्रियंकाने केली होती नाकाची सर्जरी – प्रियंकाला तिच्या लुकमूळे अनेकदा ट्रोल केले जाते. पण तिने कधीही त्याकडे लक्ष दिले नाही. प्रियंकाने तिच्या पुस्तकामध्ये या गोष्टीचा स्वीकार केला आहे. तिने सांगितले की, बॉलीवूडमध्ये आल्यानंतर तिने नाकाची सर्जरी केली होती. त्यामूळे तिचा चेहरा पुर्णपणे बदलला आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘फॅन्ड्री’ चित्रपटातील शालूचा जिलेबी बाई गाण्यावरील डान्स पाहून चाहते झाले घायाळ; पहा व्हिडीओ

पुजा हेगडेकडे चाहत्याने केली न्यूड फोटोची मागणी; तिने कसलाही विचार न करता शेअर केला ‘तो’ फोटो

सनी देओलने ज्या अभिनेत्याची धुलाई केली होती; शेवटी त्याच अभिनेत्याच्या लग्नाच्या पत्रिका स्वत: वाटल्या

४२ वर्षांची असूनही अविवाहीत आहे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता; ‘ह्या’ एका चुकीमूळे करिअर झाले होते खराब

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.