सरकारी बंगला खाली केल्यावर प्रियांका गांधींची नवी चाल; देणार भाजपला आव्हान

लखनऊ । दिल्लीमधील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस केंद्राने काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना बजावली. या निर्णयामुळे त्या भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातील लखऊनमध्ये शिफ्ट होण्याची दाट शक्यता आहे.

प्रियांका गांधी लखनऊमधील कौल हाऊसमध्ये शिफ्ट करणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकवर्तीयांनी दिली. कौल हाउस हे इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांचे आहे.

प्रियांका गांधी या पक्षाच्या सरचिटणीस आहेत. त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. त्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. यामुळे त्यांचा हा निर्णय रणनितीचा भाग मानला जात आहे.

कोरोनामुळे प्रियांका गांधी यांच्या यूपीतील भेटी कमी झाल्या होत्या. यामुळे लखनऊमधील त्या शिफ्ट झाल्यातर राजकीय दृष्टीने काँग्रेससाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रियांका गांधी काँग्रेस सरचिटणीस झाल्यानंतर यूपीमध्ये त्या अधिक सक्रिय झाल्या होत्या.

इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांच्या घरी ‘कौल हाउस’च्या दुरुस्तीचे काम आधीच करण्यात आले आहे. लखनऊमध्ये प्रियांका गांधी याच घरात राहतील, असे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील राजकारणात पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी प्रियांका गांधी मात्र नक्कीच शिफ्ट होणार आहेत. उत्तर प्रदेशात पक्ष बळकट करण्यासाठी आपला अधिकाधिक वेळ प्रियांका गांधी देणार आहेत.

उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुका आणि समीकरण पाहता येथे वेळ देणे काँग्रेससाठी फायद्याचे ठरणार आहे. यामुळे प्रियांका गांधी यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.