प्रियंका गांधींना १ ऑगस्ट पर्यंत सरकारी बंगला रिकामा करण्याचे नोटीस

 

नवी दिल्ली | काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे नोटीस मिळाले आहे. त्यासाठी त्यांना एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

१ ऑगस्टच्या आधी त्यांना सरकारी बंगला सोडावा लागणार आहे. आवास आणि शहरी मंत्रालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रानुसार दिल्लीतील लोधी रोड वर असणारा बंगला प्रियंका गांधी यांना सोडावा लागणार आहे.

सरकारी आदेशानुसार प्रियंका गांधी यांची SPG सुरक्षा काढून त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली.SPG सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीला सरकारी बंगला मिळण्याचे प्रावधान आहे.

प्रियंका गांधी यांना सध्या Z+ सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांना सरकारी बंगल्याचे प्रावधान नसल्यामुळे सरकारी बंगला सोडावा लागणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.