देसी गर्ल प्रियांका चोप्रा अमेरिकेत विकतेय वडापाव, एका वडापावची किंमत ऐकून बसेल धक्का..

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्न करून सध्या अमेरिकेत राहते. तिने भारतात लग्न केले होते. आता तीने अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट सुरु केले आहे. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ असे आहे. यामध्ये अनेक वेगवेगळे भारतीय पदार्थ मिळतात.

हे रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये आहे. यामध्ये भारतात लोकप्रिय असलेले पाणीपुरी, डोसा, कुल्चा ते अनेक अनेक पदार्थ आहेत. अनेक मोठे सेलिब्रिटींनी याठिकाणी हजेरी लावत आहेत. लोकप्रिय निर्मात्या आणि थेटरसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोला जेम्स यांनी देखील आता प्रियांकाच्या सोना या रेस्टॉरंटला भेट दिली आहे.

यावेळी त्यांनी आपल्या सर्वांचा आवडता वडापाव खाल्ला. याशिवाय लोलाने भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. या विषयी सांगत लोलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ‘यात आश्चर्य नाही न्यूयॉर्कमध्ये असलेले हे सोना अप्रतिम आहे.

या रुचकर आणि चविष्ट जेवणाकडे एकदा नजर टाका, अशा आशयाचे कॅप्शन लोलाने हे फोटो शेअर करत दिले आहे. यामुळे या रेस्टॉरंटची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेत देखील भारतीय वडापाव सर्वांना भुरळ घालत आहे. हे पदार्थ अनेकांच्या पसंतीस पडत आहेत.

असे असले तरी हे पदार्थ मात्र मोठ्या प्रमाणावर महाग आहेत. प्रियांकाच्या सोनामध्ये एका वडा पाव खाण्यासाठी तुम्हाला १४ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास १ हजार रुपये मोजावे लागतील. प्रियांकाच्या रेस्टॉरंटमध्ये वडा पाव मिळतो हे आधी कोणाला माहित नव्हते, आता मात्र तुम्हाला किंमतही माहिती झाली आहे.

वडापाव हा न्यूयॉर्कमध्ये ही लोकांच्या मनावर राज्य करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे प्रियांकाने आपला वडापाव सातासमुद्रापार नेला असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रियांकाने आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून देखील सगळीकडे नाव केले आहे.

ताज्या बातम्या

मासे धरायला गेलेल्या तरुणासोबत घडला भलताच प्रकार; खेकड्याने करकचून धरला प्रायव्हेट पार्ट आणि…; पहा व्हिडिओ

हिला लाजवाटली पाहिजे; गरजू व्यक्तीची मदत करणारी रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर झाली ट्रोल; पहा व्हिडिओ

लालूप्रसाद यांनी शरद पवारांची घेतली भेट, भेटीचे कारण सांगताना लालूप्रसाद म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.