…म्हणून लग्नाआधी मी निकच्या मागे पाठवला होता बॉडीगार्ड, प्रियांकाचा खुलासा

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे बॉलीवूडचे प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहेत. प्रियांकाने नुकतेच तिचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचे नाव अनफिनिश आहे. पुस्तकाच्या प्रमोशनसाठी तिने खूप मुलाखती दिल्या होत्या.

त्यामधील एका मुलाखतीत तिने खुलासा केला की लग्नाआधी तिने निकची हेरगिरी केली होती. द मॉर्निंग शो या कार्यक्रमात आल्यानंतर प्रियांकाला पुस्तकाच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले होते.

भारतात असताना निक तुझ्या आईला लंचला बाहेर घेऊन गेला होता, तेव्हा तुला ती गोष्ट खटकली होती का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. तेव्हा प्रियांका म्हणाली की, जे लोक मला ओळखतात त्यांना माहीत आहे की मला माझ्या आजूबाजूच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायला आवडते.

माझी एक मिटींग होती तेव्हा मी निकला म्हणाले की माझी एक मिटींग आहे तर तू काय करणार? तर तो म्हणाला की तू काळजी करू नकोस मी मुंबईत आहे. मी तुझ्या आईला लंचला घेऊन जातो. हे माझ्यासाठी थोडं विचित्र होतं.

कारण आम्ही काही दिवसांपूर्वीच सोबत आलो होतो. त्यात माझी आई आणि निक एकटेच जाणार. म्हणून मी माझ्या अंगरक्षकाला त्यांचे फोटो काढून पाठवायला सांगितले होते. त्यावरून मला त्यांच्या देहबोलीचा अभ्यास करता येईल, असे ती म्हणाली आहे.

दरम्यान, प्रियांकाचे अनफिनिश हे पुस्तक ९ फेब्रुवारीला प्रकाशित झाले होते. या पुस्तकात तिने अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकातील काही फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत आहे. प्रियांकाचे हे पुस्तक बेस्ट सेलर बुक ठरले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.