प्रियांका आणि निक जोनासचा होणार घटस्फोट? प्रियांकाने सोशल मिडीयावरून हटवले ‘जोनास’ आडनाव

बॉलिवूड अभिनेत्री ‘प्रियांका चोप्रा’ आणि तिचा पती हॉलिवूड गायक ‘निक जोनास’ हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघे अनेकदा एकमेकांवर प्रेम दाखवतात आणि सोशल मीडियावर ते चाहत्यांना त्याची झलक दाखवतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

वास्तविक प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नावासमोर जोनास हटवले आहे. निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियांका चोप्राने तिच्या सोशल मीडिया हँडलवर जोनास जोडून तिचे नाव बदलले. ती प्रियांका चोप्रा जोनास लिहायची.

मात्र, प्रियंका चोप्राने अचानक तिच्या नावासमोरून जोनास हटवून तिच्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. यासोबतच या कपलचा घटस्फोट तर होत नाही ना अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. प्रियंका चोप्राने भले तिच्या नावातून जोनास काढून टाकला असेल, पण प्रियांका चोप्रा आणि निक जोनास अजूनही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत आहेत.

विशेष म्हणजे, १ डिसेंबर २०१८ रोजी प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे लग्न झाले. ते लवकरच लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करणार आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी यापूर्वी एकत्र दिवाळी साजरी केली होती. त्याचा फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका चोप्रा अखेरची ‘द व्हाईट टायगर’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. प्रियांका चोप्रा पुढे “सिटाडेल”, “टेक्स्ट फॉर यू” आणि “मॅट्रिक्स 4” आणि “जी ले जरा” सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफ सोबत दिसणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.