गेल्या जानेवारीत प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आई-वडील झाले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्राने अद्याप तिच्या मुलीच्या नावाचा खुलासा केलेला नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या मुलीचे(Daughter) नाव ठेवले आहे.(priyanka chopra and nik jonas daughter name came infront of media)
अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा असे ठेवले आहे. तिच्या जन्म प्रमाणपत्रावरून हे नाव समोर आले आहे. सरोगसीच्या माध्यमातून अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई झाली होती. प्रियांकाच्या मुलीचा जन्म १५ जानेवारीला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चोप्राच्या मुलीचा जन्म वेळेपूर्वी झाला होता, त्यामुळे तिला काही काळ रुग्णालयात राहावे लागले होते.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना मुलीच्या जन्माची माहिती दिली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीचा फोटो अद्याप समोर आलेला नाही. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर मुलीचा फोटो पोस्ट करण्याची विनंती देखील केली आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई अद्याप नातवाला भेटलेली नाही. याचा खुलासा खुद्द प्रियांका चोप्राच्या आईने केला आहे. जन्म प्रमाणपत्रानुसार अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मुलीच्या जन्म १५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता झाला होता. या जन्म प्रमाणपत्रावर प्रियांका चोप्राच्या मुलीच्या नावाचा उल्लेख मालती मेरी चोप्रा असा करण्यात आला आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या आईचे नाव मधु मालती चोप्रा असे आहे. आईच्या नावावरूनच प्रियांका चोप्राच्या मुलीचे नाव मालती मेरी असे ठेवण्यात आले आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी अद्याप त्यांच्या मुलीचे नाव त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलेले नाही. त्यामुळे या माहितीची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चाहत्यांनी तिच्या मुलीसाठी काही नावे देखील सुचविली आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चाहत्यांनी ही नावे शेअर केली आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चाहत्यांनी तिला मुलीचे भारतीय नाव ठेवण्यास सुचवले आहे. तर काही चाहत्यांनी इंग्रजी नाव ठेवण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं कुठं घुसू एवढं लक्षात ठेवा, रुपाली पाटलांचा ब्राम्हण महासंघाला इशारा
आम्ही त्यांना देण्यासाठी १०१ रूपये दक्षिणा आणि केळी आणली होती, पण…
…तर संजय राऊतांना सुबुद्धी येईल; देवेंद्र फडणवीसांचा टोला