रेल्वेचे खाजगीकरण सुरू; १०९ मार्गांवर धावणार खाजगी रेल्वे, मोदी सरकारची घोषणा

 

नवी दिल्ली | रेल्वे मंत्रालयाने बुधवारी एक मोठी घोषणा केली असून, भारतात १०९ मार्गांवर खाजगी  सेवा सुरू करणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.

या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक १५० रेल्वेगाड्या खाजगी तत्वावर चालवण्यात याव्यात असा प्लॅन रेल्वेने आखला आहे. या संबंधी रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.

या योजनेतून भारतीय रेल्वेला ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असणार आहे. तसेच या योजनेद्वारे प्रथमच प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी खाजगी क्षेत्राला आमंत्रित केले आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

ही योजना रोजगार निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यावर होण्याऱ्या देखभाल खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, १५० अत्याधुनिक रेल्वेगाड्या यासाठी वापरण्यात येणार आहे. यातल्या बहुतेक गाड्यांची निर्मिती भारतात करण्यात आलेली आहे.

तसेच या सर्व रेल्वेगाड्या भारतीय रेल्वेच्या म्हणजेच सरकारी ड्रायव्हर आणि गार्डसकडून चालवण्यात येणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.