खाजगी वाहनधारकांना नेहमीच महामार्गांवरील टोलचा त्रास होतो. पण आता खाजगी वाहनधारकांना महामार्गांवरील टोलच्या बाबतीत दिलासा मिळणार आहे. राजस्थान सरकारने राज्यातील खाजगी वाहनांवरील टोल(Toll) टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण व्यावसायिक वाहनांवर पूर्वीप्रमाणेच टोल आकाराला जाणार आहे.(Private vehicles will be exempted from toll forever)
मिळालेल्या माहितीनुसार, आता राजस्थान राज्यातील सर्व महामार्गांवर फक्त व्यावसायिक वाहनांना टोल आकारण्यात येणार आहे. एमपीआरडीसीने यासंदर्भातील निविदा तयार करून सूचना जारी केल्या आहेत. एमपीआरडीसीचे अधिकारी रिझवी यांनी महामार्गांवरील टोल वसुलीच्या संदर्भातील माहिती दिली आहे.
“यापूर्वी सर्व खाजगी वाहनांना टोला आकाराला जात होता. पण आता सरकारच्या सूचनेनुसार व्यावसायिक वाहनांवरच टोल कर आकारला जाणार आहे. सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे”, असे एमपीआरडीसीचे अधिकारी रिझवी यांनी सांगितले आहे.
गेल्या महिन्यात राजस्थान सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत महामार्गांवरील कार, जीप आणि प्रवासी बससह खासगी वाहनांना टोल टॅक्समधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. पुढील महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील तीनही टोलनाके सुरू होतील, असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमपीआरडीसीने तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. डांबरीकरणासाठी लागणाऱ्या रकमेच्या वसुलीसाठी टोल आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थान सरकारने टोलसंदर्भात काही विभाग तयार केले आहेत. या विभागाशी संबंधित असलेल्या लोकांना टोल टॅक्स भरावा लागत नाही.
महाराष्ट्रात देखील यासारखा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांनी टोल वसुलीबाबत नाराजी दर्शविली आहे. टोल वसुलीच्या विरोधात महाराष्ट्रात अनेक आंदोलने देखील झाली आहेत. पण अद्याप महाराष्ट्र राज्य सरकारकडून टोल वसुलीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
महत्वाच्या बातम्या :-
७५ पैशांचा शेअर गेला २ हजारावर; १ लाखाचे झाले २७ कोटी; ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ
जबरदस्त! ७५ पैशांच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न, १ लाखाचे झाले २७ कोटी
४ करोडचं घड्याळ ते चार्टड प्लेन, Jr NTR ची संपत्तीचा आकडा वाचला तर बॉलिवूडकरही पडतील फिके