Homeआर्थिकखाजगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्यांना फ्री मिळणार ७ लाख रुपयांची 'ही' सुविधा...

खाजगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्यांना फ्री मिळणार ७ लाख रुपयांची ‘ही’ सुविधा…

जवळपास प्रत्येक सरकारी योजनेमध्ये काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच असते, ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नसते, पण या वैशिष्ट्याचा खूप उपयोग होतो. मात्र विशिष्ट स्कीम बद्दल ज्ञान नसणे किंवा अर्धवट माहिती असणे, यामुळे सामान्य लोकांना त्याचा पुरेपूर वापर करता येत नाही. अशाच एका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF ) बद्दल असणारी महत्वाची माहिती जाणून घेऊ, ज्यामुळे सामान्य लोकांना त्याचा फायदा होईल.

सरकारी किंवा खाजगी कंपनीत कोणी काम करत असेल आणि तुमचा PF कटत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे, प्रत्येक कर्मचाऱ्याला एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड (EPF) खात्यासह ७ लाख रुपयांपर्यंतचे जीवन विमा संरक्षण मिळते आणि तेही अगदी मोफत. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) त्यांच्या सर्व सदस्यांना त्यांच्या खात्यासह विमा सुविधा प्रदान करते. हा विमा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्याशी जोडलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विमा पूर्णपणे मोफत आहे.

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या सदस्याचा कोणत्याही आजारामुळे किंवा अपघातामुळे अचानक मृत्यू झाल्यास, विमाधारकाच्या लाभार्थीला (नॉमिनीला) ) एकरकमी पेमेंट प्रदान करते.कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्याला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. EPFO च्या प्रत्येक सदस्याला एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI) अंतर्गत हि विमा संरक्षणाची सुविधा मिळते. यामध्ये, विमा संरक्षण अंतर्गत नॉमिनीला कमाल ७ लाख रुपये दिले जातात. २०२१ मध्ये कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना, १९७६ (EDLI योजना) अंतर्गत दिलेल्या विमा रकमेची मर्यादा आता ६ लाख रुपयांवरून ७ लाख रुपये करण्यात आली आहे.

यापूर्वी त्याची मर्यादा ३.६० लाख रुपये होती. त्यानंतर ही मर्यादा ६ लाख रुपये करण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही मर्यादा सात लाख रुपये करण्यात आली होती. बोनसची मर्यादाही १.५ लाखांवरून २.५ लाख रुपये करण्यात आली आहे. EPFO च्या सदस्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या नॉमिनीला २० टक्के बोनससह गेल्या एका वर्षाच्या सरासरी पगाराच्या ३० पट मिळतो.

ही गणना उदाहरण घेऊन समजू शकते. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ उत्पन्न दरमहा रु. १५,०००असेल. जर तुम्ही असे ३०वेळा केले तर ही रक्कम ४,५०,००० रुपये होईल. आणि आता यात २,५०,००० रुपयांचा बोनस जोडला जाईल, त्यामुळे ही रक्कम ७ लाख रुपये होईल. कमाल विमा दावा ७ लाख रुपयांपर्यंत आहे. ईपीएफओ सदस्याच्या मृत्यूनंतर, खात्याचा नॉमिनी विमा रकमेवर दावा करू शकतो.

यासाठी विमा कंपनीला मृत्यू प्रमाणपत्र आणि बँक तपशील यांसारखी कागदपत्रे द्यावी लागतील. जर नामनिर्देशित व्यक्ती नसेल तर कायदेशीर वारस या रकमेवर दावा करू शकतो. सेवेत असताना पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाला असेल तरच ईपीएफ खात्यावरील या विम्यावर दावा केला जाऊ शकतो. या दरम्यान, तो कार्यालयात काम करत असला किंवा रजेवर असेल तरी, काही फरक पडत नाही. नॉमिनी पैशाचा दावा करू शकतो. मात्र, निवृत्तीनंतर विम्याच्या रकमेवर दावा केला जाऊ शकत नाही.

महत्वाच्या बातम्या
नवीन वर्षात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, सोन्याच्या किमतीत ६ वर्षातील सर्वात मोठी घसरण
“आम्हाला जगू द्या, आम्हाला मारू नका”, बड्या शिवसेना नेत्याची आर्त हाक
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागन; ट्विट करत लोकांना केले ‘हे’ आवाहन

 

ताज्या बातम्या