खाजगी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! पगार वाढीसह मिळणार ‘या’ गोष्टी

दिल्ली । कोरोनामुळे या वर्षी अनेक खाजगी कंपन्यांमध्ये पगारवाढ झाली नाही तसेच अनेकांना बढती मिळणार होती. मात्र ती देखील कोरोनाने रोखली आहे. यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.

आता मात्र त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ मिळणार आहे. याबाबत अनेक कंपन्यांनी पगारवाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या ही वाढ करणार आहेत.

कोरोनामुळे यावर्षी अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता अनलॉकमुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यामुळे ही पगारवाढ शक्य होणार आहे. यामध्ये आयटी, ई कॉमर्स, इत्यादी क्षेत्रात मोठी पगारवाढ होणार आहे.

यासह इतर अनेक गोष्टींमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये इतर सोयींमध्ये मोठी वाढ करण्यात येणार आहे. यामुळे २०२१ चे येणारे वर्ष खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. अनेक कंपन्या बंद होत्या. आता त्या सुरू करण्यात येत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.