मोठी बातमी! भारतीय रेल्वेत मोठे बदल होणार, खाजगी कंपन्या भाड्याने घेणार रेल्वे

भारतात सध्या अनेक गोष्टींचे खाजगीकरण केले जात आहे. असे असतानाच आता भारतीय रेल्वेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आता खाजगी कंपन्या रेल्वेचे कोच भाड्याने घेऊ शकणार आहे, तसेच ते खरेदीही करता येऊ शकणार आहे.

भारतीय रेल्वे लवकरच भाडे तत्वाची अंमलबजावणी करणार आहे. भारतीय रेल्वेद्वारे चालविण्यात येणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटक सर्किट ट्रेन खाजगी कंपन्यांना भाडे तत्वावर दिल्या जाणार आहे.

रेल्वेने शनिवारी एक प्रकाशन जारी केले आहे. त्यामध्ये भाडे तत्वाबाबत योजनेचे धोरण, नियम आणि अटी तयार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कार्यकारी निर्देशक स्तरावर समितीचे गठन केले आहे. तसेच यासाठी नियमावली तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

इच्छुक कंपनीने थीमवर आधारीत सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य पर्यटक सर्किट ट्रेन चालवण्यासाठी कोचिंग स्टॉकला भाड्याने देऊन रेल्वे पर्यटन वाढवण्याचे ध्येय आहे. त्यानुसार, कंपनीला १६ कोच असणारी ट्रेन भाड्याने किंवा खरेदी करणे आवश्यक असणार आहे.

त्यानंतर कंपनी कोचला रेल्वेच्या गाईडलाईन्सच्या अधिन राहून आपल्या परीने प्रवाशांसाठी तयार करणार आहे. तसेच कोचमध्ये मोठे बदल करण्याची परवानगी रेल्वेकडून दिली जाणार नाही. पण कोचच्या लुकमध्ये कंपन्या थोडाफार बदल करु शकणार आहे. कंपनीला ट्रेन कमीत कमीपाच वर्षांसाठी भाडे तत्वावर घ्यावी लागणार आहे.

कंपनीला ट्रेन विकत घ्यायची असेल, तर कंपनीला सर्वात आधी आपले बिझनेस मॉडेल सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर भारतीय रेल्वे निर्णय घेणार आहे की, ट्रेन भाडे तत्वावर किंवा विक्री करायची कि नाही.

महत्वाच्या बातम्या-

“तीन पक्षाचं सरकार सांभाळणं ठाकरे सरकारचा प्राधान्यक्रम, त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर उडाली”
“…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”‘तारक मेहता…’फेम बबिता भडकली
त्यावेळी मला मरावंस वाटत होतं; दिपीकाने सांगीतला ‘तो’ भयानक किस्सा; अशी वेळ कुणावरही येऊ नये…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.