प्रेमात पागल झालेल्या प्रीती झिंटाने करिअरकडे केले दुलर्क्ष; आज झाली आहे ‘अशी’ अवस्था

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये प्रीती झिंटाचे नाव देखील येते. प्रीतीने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलीवूडची डिंपल गर्ल म्हणून प्रीती झिंटाला ओळखले जाते. तिच्या सुंदरतेने तरुण आजही घायाळ होतात. प्रीतीने हिंदीसोबतच तमिळ, तेलुगु, पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रिती झिंटाचा जन्म ३१ जानेवारी १९७५ ला शिमलामध्ये झाला होता. ती १३ वर्षांची होती त्यावेळी तिच्या वडीलांचा मृत्यू झाला होता. तिचे वडील इंडीयन आर्मीमध्ये काम करत होते. कार आपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. तर आई गंभीररित्या जखमी झाली होती. अशा परिस्थितीमध्ये देखील प्रीतीने हार मानली नाही. ती खंभीरपणे कुटूंबासोबत उभी होती.

प्रीतीने शिमला आणि दिल्लीतून तिचे शिक्षण पुर्ण केले होते. प्रीतीला अभिनय क्षेत्रात जास्त रुची नव्हती. ती एकदा तिच्या मित्राच्या घरी पार्टीला गेली होती. त्यावेळी एका दिग्दर्शकाची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला एका चॉकलेटच्या जाहीरातीसाठी विचारणा केली. तिने जाहीरातीसाठी होकार दिला.

अशा प्रकारे प्रीती झिंटाने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल से’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. पहील्याच चित्रपटातून तिला बॉलीवूडमध्ये यश मिळाले होते. त्यानंतर प्रीतीने मागे वळून पाहीले नाही. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

सोल्जर, कभी अलविदा ना कहेना, कल हो ना हो, संघर्ष, वीर झारा, चोरी चोरी चुपके चुपके अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. काही वर्षांमध्येच प्रीती झिंटा बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री झाली होती. तिचे जगभरात करोडो चाहते निर्माण झाले होते.

प्रीती तिच्या करिअरच्या यशाच्या शिखरावर होती. याच कालावधीमध्ये तिची भेट बिजनेस मॅन नेस वाडीयासोबत झाली होती. काही काळाच्या मैत्रीनंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. प्रीतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर दोघांनी मिळून आयपीएलची टिम खरेदी केली होती.

प्रीती झिंटा आयपीएल टिमची मालकिण होती. दोघांनी या टिमसाठी करोडो रुपये खर्च केले. पण काही कालांतराने दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाली. दोघांचे ब्रेकअप झाले. एवढेच नाही तर दोघांचे वाद कोर्टापर्यंत गेले होते. त्याकाळी या ब्रेकअपची खुप जास्त चर्चा सुरु होती.

नेस वाडीयासोबतच्या खराब नात्यामूळे प्रीती झिंटाचे तिच्या करिअरकडे दुलर्क्ष झाले होते. त्यामूळे तिचे करिअर पुर्णपणे खराब झाले. २०१३ मध्ये प्रितीने बॉलीवूडमध्ये कमबॅक केले. पण तिला काही खास यश मिळाले नाही. म्हणून तिने अभिनय क्षेत्र सोडून बिजनेस सुरु करण्याचा निर्णय घेतला.

नेस वाडियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रीती झिंटा क्रिकेटर युवराज सिंगच्या प्रेमात पडली. क्रिकेट आणि बॉलीवूड दोन्हीकडे दोघांच्या नात्याची चर्चा होत होती. प्रीतीला लग्न करायचे होते. पण युवराज लग्नासाठी तयार नव्हता. या कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाले.

प्रीती झिंटा आज यशस्वी बिजनेस वुमन आहे. २०१६ मध्ये प्रीतीने जीन गुडइनफसोबत लग्न केले. प्रीतीने अतिशय शाही पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर प्रीती झिंटा अमेरिकेत स्थायित झाली. प्रीती करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे.

भारत लंडनसोबतच अनेक ठिकाणी तिचे घरं आहेत. ती अनेक महागड्या गाड्यांची मालकिण आहे. अनेक ठिकाणी तिने संपत्तीची गुंतवणूक केली आहे. आज प्रीती चित्रपटांपासून लांब असली तरी नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडीयावर देखील प्रीती मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

महत्त्वाच्या बातम्या –

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा बेडवर ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

अभिनेत्री जया बच्चन पहिल्यांदाच मराठी चित्रपटात करणार काम; पहा कोणता आहे तो चित्रपट..

माधूरी दिक्षितचे मेकअप शिवाय फोटो बघून तुम्हाला येईल चक्कर; ओळखणे आहे कठिण

विराटच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या अनुष्काने ‘तो’ फोटो शेअर करत , म्हणाली….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.