काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत त्यांचे वाद झाले आहे. तसेच नाना पटोलेंसोबत काम करणं कठीण होत असल्याचेही थोरातांनी म्हटले आहे.
याबाबत बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनाही याबाबत पत्र लिहीलं आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन थोड्याच दिवसांमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे नवीन गटनेता ठरवण्यासाठी काँग्रेसमध्ये हालचाली सुरु झाल्या आहे. या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर येत आहे.
काँग्रेसच्या गटनेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची निवड होणार असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाशी सहमत असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे विधीमंडळाच्या गटनेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांचीच निवड होणार असल्याची चर्चा आहे.
पृथ्वीराज चव्हाण आणि मल्लिकाअर्जून खर्गे यांच्यात जवळीक आहे. त्यामुळेही पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर गटनेतेपदाचा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा अनुभवही आहे. तसेच सभागृह आणि कामकाजाची माहिकी सुद्धा त्यांना आहे.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण जर काँग्रेसचे गटनेते झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पृथ्वीराज चव्हाण जर गटनेते झाले तर विरोधी पक्षनेते हे अजित पवारांकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी गटनेतेपदाचं आणि विरोधी पक्षनेत्याचं समन्वय महत्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि चव्हाण यांच्यातलं नातं नेहमीच वादातलंं आहे. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पृथ्वीराजच चव्हाणांवर आरोप केले होते. २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेचं राज्यातील सरकार गेल्याचं अजित पवारांनी म्हटले होते. ते डायरेक्ट दिल्लीहून आले होते. त्यांना आमदारकीचाही अनुभव नव्हता, असे अजित पवारांनी म्हटले होते.
तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होती. पण २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या वादानंतर त्यांनी विधानसभा निवडणूकांच्या काही दिवसांआधीच काँग्रेसला दिलेला पाठिंबा काढून घेतला. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून चव्हाणांचं नाव पुढे करण्यात आलं होतं. पण त्याला राष्ट्रवादीने विरोध केला होता.
महत्वाच्या बातम्या-
मविआत पुन्हा उभी फूट! १५ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश; कोण आहेत हे १५ आमदार?
शिंदे नाही तर ‘या’ बड्या काॅंग्रेस नेत्यामुळेच पडले मविआ सरकार; शिवसेनेच्या आरोपांनी उडाली खळबळ
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने केले भारतीय तरुणीशी लग्न, सासूला पटवण्यासाठी तरुणी नाच नाच नाचली