“आम्ही तेल प्रकल्प तरी उभारले, सात वर्षात तुम्ही काय केलं”

सातारा | “मागील सरकारने कमीतकमी देशांतर्गत तेल प्रकल्प तरी उभारले. तुम्ही सात वर्षांत काय केले ते सांगा” असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरुन राजकारणाचा चांगलाच भडका उडाला आहे. इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुर्वीच्या सरकारला या दरवाढीसाठी जबाबदार ठरवले होते. पंतप्रधानांच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे.

सातारा जिल्हा काँग्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ होत आहे. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यात केंद्र सरकार धन्यता मानत आहे. अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

देशाच्या मागणीच्या तुलनेत ८५ टक्के तेल आयात करावे लागत आहे. या तेलाची किंमत आंतराष्ट्रीय पातळीवर निश्चित होते. चुकीच्या कररचनेमुळे आणि सरकारच्या आडमुठेपणामुळे देशवासीयांना पेट्रोल,डिझेल महाग मिळत आहे. अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेचा समाचार घेताना चव्हाण म्हणाले, “आधीच्या सरकारांनी देशातील साठ्यांचा शोध घेत तेल प्रकल्प उभारले आहेत. तुम्ही सात वर्षांत कोणते प्रकल्प उभारले ते जाहीरपणे सांगा”.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक असा वाद रंगला आहे. केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करावे असे राज्य सरकार म्हणत आहे. तर राज्य सरकारने कर कमी करावेत अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
दोन वर्गमित्रांना ACB ने लाच घेताना केली अटक, एक होता उपजिल्हाधिकारी दुसरा गटविकास अधिकारी
‘अब्दूल कलामांना मोदींनीच राष्ट्रपती केले; चंद्रकांत पाटलांनी उधळली मुक्ताफळे, वाचा..
पेट्रोलच्या वाढत्या दरापासून आता होईल सुटका, भारतात लॉन्च झाली इलेक्ट्रिक सायकल
भाजपच्या बड्या महीला नेत्याच्या गाडीतून ९० लाखांचे ड्रग्ज जप्त; राजकारणात खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.