ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ढसाढसा रडला, अन् आता सचिनच्या ‘गुरूमंत्र’नं पृथ्वी शॉने पाडला रन्सचा पाऊस

मुंबई | भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत १८८.५ च्या सरासरीने ७५४ धावा केल्या आहेत. या मोसमात पृथ्वी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला सलामी फलंदाज म्हणून पहिली पसंती देण्यात आली होती. तेव्हा त्याने खूपच खराब कामगिरी केली आहे.

याबाबत पृथ्वीनं एक खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतल्यानंतर आपण सचिन तेंडुलकरशी चर्चा केली, त्याच्या सल्ल्यानुसार आपण फलंदाजी तंत्रात सुधारणा केली. आणि त्यामुळे आपल्याला यश मिळाले असल्याचे पृथ्वी शॉने म्हटले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून पृथ्वीला पसंती देण्यात आली. पण ऍडिलेड कसोटीत पहिल्या डावात त्याला खाते उघडता आले नाही. तर दुसऱ्या डावात तो अवघ्या ४ धावांवर बाद झाला. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी पुढील कसोटीत शुभमन गिलला संधी देण्यात आली.

पृथ्वीचा खुलासा-
मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात परतलो. त्यानंतर मी सचिन सरांना भेटलो. त्यांनी मला चेंडू शरीराजवळ खेळण्याचा सल्ला दिला. पण मी चेंडू उशिराने खेळत होतो. असं कदाचित मी आयपीएलमध्ये खेळत असल्याने होतं असाव. दरम्यान, मी सचिन सरांचा सल्ला ऐकला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना यावर फार मेहनत घेतली.

तसेच, मी आतापर्यत संपूर्ण क्रिकेट बॅट शरिराजवळ न ठेवता खेळलो आहे. पण मला हीच सवय बदलायची होती. हे माझ्यासाठी फार आव्हानात्मक होतं. पण मी यावर फार मेहनत घेतली. सचिन सरांचा सल्ला ऐकला. त्याचा मला फायदा झाला. असे पृथ्वी शॉने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
वीरेंद्र सेहवागची तुफान फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर चौकार तर षटकार खेचत अर्धशतक; पहा व्हिडीओ
खोटं खेळून सेहवागचे शतक हुकवणाऱ्या खेळाडूवर आता आलीय ड्रायव्हरची नोकरी करून पोट भरण्याची वेळ
अभिमानास्पद! मिताली राजने बनवला भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.