Share

‘मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावरून धर्मा-धर्मात दुही’, भाजपच्या मुंडेंनी स्वपक्षालाच सुनावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं आहे. भाजप पक्षाने देखील मनसेच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. पण मशिदींवरील भोंग्यांबाबत काही राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवरून भाजप खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(pritam munde He told his own party)

सध्या धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे, अशी खंत भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी राज ठाकरेंचा स्पष्ट उल्लेख करण्याचे टाळले. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी आज बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेने घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना भाजप खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, “सध्या धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. याआधी आपल्या समाजात गुण्या-गोविंदाने गोष्टी नांदत होत्या. त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे”, असे प्रीतम मुंडे यांनी सांगितले आहे.

यावेळी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले. कोविड काळात राज्य सरकारने चांगलं काम केलं, असे भाजप खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या. “राजकीय आरोप-प्रत्यारोप वेगळा मुद्दा असतो. पण कोविड काळात महाराष्ट्रासारख्या देशातील एका मोठ्या राज्यात आरोग्य व्यवस्थेवर संकट होतं. मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असताना देखील महाराष्ट्र सरकारने चांगली कामगिरी केली”, असं वक्तव्य भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे राज्य सरकारने ३ मे पर्यंत काढावेत, असं विधान केलं होतं. सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. यादरम्यान नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंग्यांबाबत एक महत्वाचा आदेश दिला आहे. आता नाशिक जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर असणाऱ्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.

नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांनी ३ मे पर्यंत भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, असा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी न घेतल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, कोणत्याही मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालिसा म्हणण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अजाणाच्या वेळी हनुमान चालिसा लावता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या :-
१७ वर्षात नाशिक शहरात भोंग्यांसाठी परवानगीच घेतली नाही, पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती
३ मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई करणार; नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा
“हिंदूंनो चार मुलांना जन्म द्या, त्यातील दोन संघ आणि विश्व हिंदू परिषदेला द्या”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now