विद्यार्थीनीच्या कपड्यांवरून मुख्याधापक बेताल; म्हणाला, कपडे नसते घातले तरी चाललं असतं

सध्या देशभरातल्या काही ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा कॉलेज बंद करण्यात आल्या तर काही ठिकाणी शाळा आता सुरु करण्यात आल्या आहे. अशात शाळेतून अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहे. असेच एक प्रकरण मध्य प्रदेशातून समोर आले आहे.

आता मध्य प्रदेशातील राजगडमधून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलीने शाळेत घातलेल्या गणवेशावर आक्षेप घेत तिला अश्लील भाषेत सुनावले आहे. त्यानंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्यधापकाचे नाव राधेश्याम मालवीय आहे. त्यांचे वय सुमारे ५० वर्षे आहे. शाळेचा गणवेश न घातल्यामुळे ते विद्यार्थीनीवर खुप संतापले, इतकेच नाही, तर तिला वाईट भाषेतही सुनावले आहे. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला इशारा दिला की पुढच्या वेळी ती गणवेशातच शाळेत आली पाहिजे.

मुलीने सांगितले की तिचा गणवेश अजून शिवला नाही, म्हणूनच ती गणवेश न घालता शाळेत आली. विद्यार्थिनीने सांगितले की मुख्याध्यापिकेने तिला सांगितले की तू हे कपडे देखील काढून टाकले असते तर बरे झाले असते. खरंतर मुख्याध्यापकांनी लहान कपडे घातलेल्या मुलीवर आक्षेप घेतला. तक्रारीत सांगण्यात आले की आरोपी प्राचार्याने असेही सांगितले की मुलींनी असे कपडे घातल्याने मुले खराब होतात.

संबंधित घटना राजगढच्या मचलपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. उपनिरीक्षक जितेंद्र अजनारे यांनी सांगितले की, आरोपी प्राचार्याविरुद्ध पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच तीन विद्यार्थिनींचे जबाब न्यायालयात नोंदवले जाईल. मुख्याध्यापकांना अटक करण्यासाठी पोलीस पथक त्याच्या घरी गेले होते, परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. राजगढ जिल्हा शिक्षणाधिकारी (डीईओ) बी एस बिसोरिया यांनी सांगितले की, आरोपी प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

डायरेक्टरने रात्री सोबत झोपण्याची ऑफर केल्यावर मराठमोळ्या श्रुती मराठेने काय उत्तर दिले पहा…
‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए….’ निकालानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज
Hindustan 10: भारतात बनवली गेलेली ती पहिली कार जिला पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची उडायची झुंबड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.