मुंबई | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील मांजरी येथे असलेल्या सिरम इन्स्टिटयूटला भेट दिली. या भेटीत मोदी यांनी कोरोना लसच्या निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यानंतर सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या या भेटीविषयी माहिती दिली.
पुनावाला म्हणाले, ‘जगभरातील एकूण लसींपैकी ५०-६० टक्के लसी भारतात बनवल्या जातात. याशिवाय आता आत्मनिर्भर भारत मोहिमेचा विचार करता आपण साथीरोगाशी लढण्यासाठी पुण्यातील मांजरी येथे सर्वात मोठी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेचीही पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली.’
पूनावाला म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे.त्यांना कोव्हीशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान लसीच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत समाधानी आहे.
‘लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे असंही पुनावाला यांनी म्हटले आहे. जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार असेही पुनावाला यांनी येथे बोलताना नमूद केले.
दरम्यान, ‘आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक असल्याचे पुनावाला यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
…तरच वडीलांच्या संपत्तीवर मुली हक्क दाखवू शकतात; जाणून घ्या सविस्तर
युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्रीचा चाबूक डान्स; एकदा हा भन्नाट व्हिडीओ पाहाच
लसीचे वितरण कसे होईल? लस कुठे साठवणार? याबद्दल पुनावालांनी दिली महत्वाची माहिती